‘मोटो जी 77 पॉवर’ स्मार्टफोन लाँच
किंमत 23,999 रुपये : 50 एमपी सोनी कॅमेऱ्यासह 7000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मोटोरोलाने भारतात आपला नवीन स्मार्टफोन ‘मोटो जी 77 पॉवर’ लाँच केला आहे. या फोनची प्रमुख वैशिष्ट्यो म्हणजे यात असलेली प्रचंड 7000 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि ‘रॅम बूस्ट’ तंत्रज्ञान, जे व्हर्च्युअल रॅम विस्ताराद्वारे 24 जीबी रॅमची क्षमता आहे. मोटोरोलाने यात 50 मेगापिक्सेलचा सोनी कॅमेरा आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 प्रोसेसर दिला आहे. मोटो जी 77 पॉवर एकाच मॉडेलमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. याची किंमत 25,999 आहे. कंपनी लाँच ऑफर म्हणून 2,000 ची सूट देत आहे, ज्यामुळे याची खरेदी किंमत 23,999 होते. हा फोन अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
डिझाइन: हा फोन मजबूत आणि प्रीमियम प्लास्टिक-पॉलीकार्बोनेट मटेरियलपासून बनवला आहे. मागील पॅनेलवर एक विशिष्ट पोत (टेक्स्चर) आहे, ज्यामुळे चांगली पकड मिळते आणि फिंगरप्रिंट्सचे डाग पडत नाहीत. पोर्ट्स आणि बटणे: व्हॉल्यूम बटणे आणि पॉवर बटण (जे फिंगरप्रिंट सेन्सरचेही काम करते) फोनच्या उजव्या बाजूला आहेत.
ऑपरेटिंग सिस्टम:
हा फोन अँड्रॉईड 16 वर चालतो आणि यात मोटोरोलाचा ‘एमवाय युएक्स’ हा क्लीन इंटरफेस देण्यात आला आहे.