‘मदर्स इन्स्टिंक्ट्स’ ओटीटीवर येणार
ऐनी हॅथवेचा सायकोलॉजिकल थ्रिलरपट
हॉलिवूड अभिनेत्री ऐनी हॅथवेचा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट मदर्स इन्स्टिंक्ट्स आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. निर्मात्यांनी आईची कहाणी आणि संघर्ष दाखविणाऱ्या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित केले आहे. हा चित्रपट थ्रिलर धाटणीचा असून यात ऐनी हॅथवे, केली कारमायकल आणि जेसिका चॅस्टेन यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
हा चित्रपट लायन्सगेट प्लेवर स्ट्रीम होत आहे. या चित्रपटात दु:ख ईष्या, मैत्री आणि मानसिक आजारांच्या विषयांचे चित्रण प्रभावीपणे करण्यात आले आहे. हा चित्रपट एका लोकप्रिय कादंबरीवर आधारित आहे.
मदर्स इन्स्टिंक्ट्स चित्रपटाची कहाणी 1960 च्या दशकाला दर्शविणारी असून यात एलिस आणि सेलिन नावाच्या दोन मैत्रिणींची कहाणी आहे. त्यांच्या सुखद जीवनात अचानक एक दु:खद घटना घडते. चित्रपटात त्यांच्या एका मुलाचा दुर्घटनेत मृत्यू होतो. या घटनेनंतर दोन्ही महिला कशाप्रकारे पूर्ण समस्येला सामोरे जातात यावर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटात एलिस ही व्यक्तिरेखा जेसिका चॅस्टेनने साकारली आहे. तर सेलिनच्या भूमिकेत ऐनी हॅथवे आहे.