For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्माराम दळवी यांना मातृशोक

12:28 PM Jan 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आत्माराम दळवी यांना मातृशोक
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

Advertisement

विलवडे मळावाडी येथील रहिवासी सौ सुनिता पांडुरंग दळवी (७५) यांचे रविवारी २५ जानेवारीला सायंकाळी उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत दळवी कुटुंबीयांचे सांत्वन केले. सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विलवडे येथील ओम साई फेब्रिकेशनचे मालक आत्माराम दळवी आणि प्रगतशील बागायतदार चंद्रकांत दळवी यांच्या मातोश्री तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्या त्या काकी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, दिर, जाऊ, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.