For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माहेरी जाण्यास नकार दिला म्हणून राक्षसी मातेने ८ महिन्यांच्या चिमुकलीला ॲसिड पाजले

06:05 PM May 20, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
माहेरी जाण्यास नकार दिला म्हणून राक्षसी मातेने ८ महिन्यांच्या चिमुकलीला ॲसिड पाजले
Advertisement

आपल्या हट्टापायी माणूस कधी कधी आपलं आणि इतरांचं प्रचंड नुकसान करतो. काही लोकांच्या रागाचा पारा इतका चढलेला असतो की ते इतरांच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. अशीच एक घटना राजस्थानमधील अलवर येथे घडली आहे. एका मातेने क्रुरतेच्या सगळ्या सीमा पार करत आपल्याच ८ महिन्यांच्या मुलीला ॲसिड पाजलं आहे. नवरा माहेरी नेत नसल्याच्या कारणावरुन हे भयंकर कृत्य केलं असल्याचं कारण समोर आलं आहे. रुग्णालयात दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, अखेर बुधवारी त्या मुलीचा मृत्यू झाला.

Advertisement

तिचा आग्रह पूर्ण झाला नाही म्हणून तिने...

मृत मुलीचे वडील मोहित यांनी सांगितले की, ते एका खाजगी कंपनीत काम करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी माहेरी जाण्याचा हट्ट करत होती . कंपनीतून सुट्टी मिळताच तिला सोडून देऊ, असे सांगून मोहितने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. पण सोमवारी (१८ तारखेला), मोहित कामावर असताना, त्यांच्या पत्नीचा संताप अनावर झाला आणि तिने घरात ठेवलेले ॲसिड त्यांच्या तान्ही मुलीच्या घशात ओतले.

मुलीची नाजूक स्थिती

Advertisement

ॲसिड प्याजल्यानंतर मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. तिला तात्काळ अलवर येथील बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकाने तिचा जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. दोन दिवसांच्या उपचारानंतर, त्या निष्पाप मुलीने बुधवारी अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूनंतर, तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला असून, तिथे शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे. आरोपी आईदेखील सध्या रुग्णालयात दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे.

वडिलांची कठोर शिक्षेची मागणी.
या भीषण घटनेनंतर अलवर परिसरात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. दुःखाने व्याकूळ झालेले आणि रडत असलेले वडील मोहित यांनी आपल्या पत्नीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मोहित म्हणतात की,
:ज्याने माझ्या निष्पाप मुलीला कोणताही दोष नसताना इतका वेदनादायक मृत्यू दिला, त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझ्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे".

पोलिसांनी तपास सुरू केला आहे
.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होतील आणि आरोपी महिलेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Advertisement
Tags :

.