देववाणी परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश; विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कामगिरी
सावंतवाडी प्रतिनिधी : संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संस्कृत भारती, गोवा संस्थेतर्फे आयोजित विविध देववाणी परीक्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
देववाणी प्रवेश परीक्षेत शाळेचे १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये करिश्मा मांजरेकर हिने प्रथम, चैतन्य सावंत याने द्वितीय तर साईल पालकर याने तृतीय क्रमांक मिळवला.
देववाणी परिचय परीक्षेत सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वैष्णवी बोडके हिने प्रथम, करिश्मा मांजरेकर हिने द्वितीय तर लावण्या केसरकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.
देववाणी प्रबोध परीक्षेत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मृण्मय शिरोडकर याने प्रथम, समृद्धी मडगावकर हिने द्वितीय तर समीक्षा केसरकर हिने तृतीय क्रमांक मिळवला.
तर देववाणी प्रदीप परीक्षेतही पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ईशान गावकर याने प्रथम, गुंजन गावडे हिने द्वितीय तर पौर्णिमा बाबजी हिने तृतीय क्रमांक मिळवला.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका श्रृती जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर आणि शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संचालक दिलीप देसाई, सहसंचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत यांच्यासह पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.