For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के

03:07 PM May 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूलने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तुंग यश संपादित करून 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत पुन्हा एकदा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.कु. मानसी मिलेश मालजी हिने 96.60% प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर कु.आयुष जितेष वेंगुर्लेकर याने 95.40% मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कु. पियुषा उमाजी राणे हिने 94% संपादित करून तृतीय क्रमांक पटकावला.तसेच कु. यश विष्णू देसाई 93.60% , कु.पुर्वा प्रवीण देसाई 91.60%, कु.त्रिशा कांडरकर 90.80, कु भुषण मडगावकर 90.80 यांनी देखील नेत्रदीपक यश संपादित केले.प्रशालेतून एकूण 53 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.त्यापैकी 35 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले व उर्वरित विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक श्री अॅड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉक्टर श्री.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.