राष्ट्रीय बाल विज्ञान परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडीच्या विदयार्थ्यांनी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद सिंधुदुर्ग आयोजित विज्ञान प्रकल्पांचे ऑनलाईन सादरीकरण या स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादित केले.८ ते १४ वर्षे या वयोगटात कु. विभव राउळ (इ. ७वी), कु. पार्थ गावकर (इ. ७वी) या विदयार्थ्यांनी सागवान वनस्पती या विषयावर प्रकल्प सादर करून व्दितीय क्रमांक पटकावला तसेच कु. पौर्णिमा बाबजी (इ. ८वी), कु. श्रेया गावडे (इ. ८वी) या विदयार्थीनींनी मधमाशी अभ्यास या विषयावर प्रकल्प सादर करून तृतीय क्रमांक संपादित केला.
१४ ते १८ वयोगटात कु. युक्ता सापळे (इ.९वी), कु. जान्हवी कुडतरकर (इ.९वी) या विदयार्थीनींनी स्थलिय परिसंस्था या विषयावर प्रकल्प सादर करून व्दितीय क्रमांक पटकावला तसेच कु. पियुषा राणे (इ. ९वी) कु. राहीन करोल (इ. ९वी) या विदयार्थीनींनी अडुळसा अभ्यास या विषयावर प्रकल्प सादर करून तृतीय क्रमांक संपादीत केला. प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका श्रीम. प्राजक्ता मांजरेकर यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबददल सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रदधाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले