For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime News | आईने रागाच्या भरात डोक्यात घातली चिऱ्याची बीट; व्यसनी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

11:44 AM May 05, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime  news   आईने रागाच्या भरात डोक्यात घातली चिऱ्याची बीट  व्यसनी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
Advertisement

       दारूसाठी छळणाऱ्या पोटच्या मुलाचा आईच्या हातून खून

Advertisement

उचगाव -दारू पिण्यासाठी पैसे मागून वारंवार मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या मुलाच्या डोक्यात आईनेच चिऱ्याची बीट घातल्याने तो जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सौरभदिलीप निकम (वय २६ रा. चिंचवाड हायस्कूल गडमुडशिंगी ता करवीर) असे मृताचे नाव आहे.दारूचे व्यसन असल्यामुळे सौरभहा व्यसनेच्या आहारी गेल्याने वारंवार दारू पिऊन शिवीगाळ करून आईला मारहाण करत होता.

शुक्रवारी (दि.१) रोजी आई जयश्री सुरेश घाटगे यांनी रागाच्या भरात सौरभ यांच्या डोक्यात चिऱ्याची बीट घालून मुलग्याला गंभीर जखमी केले होते. त्याला पोलिसांनीगांधीनगर येथील वसाहत रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून सीपीआरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले होते. पण दोन दिवसापासून त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान या घटनेची नोंद गांधीनगर पोलिसात झाली असून आई जयश्री घाटगे यांच्याविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल कदम करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.