For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठ मुलांची आई जावयासोबत पळाली, १२ वर्षांच्या प्रेमप्रकरणाचा अखेर बोभाटा

03:01 PM May 16, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
आठ मुलांची आई जावयासोबत पळाली  १२ वर्षांच्या प्रेमप्रकरणाचा अखेर बोभाटा
UP Crime
Advertisement

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे, नात्यांना काळीमा फासणाऱ्या या प्रकरणात तब्बल आठ मुलांची आई स्वतःच्या जावयासोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा जावईही पाच मुलांचा पिता असल्याने गावात संताप, चर्चा आणि तर्क-वितर्काना उधाण आले आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे.

Advertisement

प्रकरण साधेच वाटले; पण...
सुरुवातीला साधे वाटणारे हे प्रकरण आता 'गुप्त प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नात्यांच्या विश्वासघाताची सनसनाटी कथा' म्हणून चर्चेत आले आहे. ही घटना आग्रा जिल्ह्यातील अछनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. कुटुंबात लग्नसमारंभ संपन्न होणार की घरातच एक 'गुप्त प्रेमकथा' पुन्हा डोके वर असताना कुणालाही कल्पना नव्हती नेमकं घडणार काय?. आरोपी जावई सासरी आला होता. दुपारच्या सुमारास त्याने जावयासोबत पळाली आठ मुलांची आई

दोन कुटुंबं उद्‌ध्वस्त

Advertisement

या घटनेने महिलेचा पती पूर्णपणे खचला आहे. आठ मुलांचा पिता असलेल्या पतीला पत्नीच्या या निर्णयाने मोठा मानसिक धक्का बसला आहे. दुसरीकडे, गावात आता एकच चर्चा सुरू आहे सासू आणि जावई हे नातं प्रेमात कस बदललं?' अनेकजण या घटनेला नैतिकतेचा ऱ्हास मानत आहेत, तर काहींनी कुटुंबीयांनी बेळेवर कठोर भूमिका घेतली असती तर आजची वेळ आली नसती, असे मत व्यक्त केले आहे.

दुपारची वेळ होती. सासरी आलेल्या जावयाने मेहंदीची पाने तोडायची आहेत' असा बहाणा करत सासूला घरामागील शेतात बोलावले. काही वेळ उलटल्यानंतर दोघेही परत न आव्याने कुटुंबीयांना संशय आला. शोधाशोध सुरू आली आणि जे दृश्य समोर आले, त्याने सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांनी दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचा दावा केला. घरात एकच गोंधळ उडाला. संतप्त नातेवाईकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच आरोपी जावई आपल्या सासूला मोटारसायकलवर बसवून थेट फरार झाला.

१२ वर्षांपूर्वीही 'तोच अध्याय

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही घटना अचानक घडलेली नाही. मोठ्या जावयाचे आणि सासूचे संबंध तब्बल १२ वर्षांपासून सुरू होते. कुटुंबातील दोन सख्ख्या भावांची लग्ने दोन सख्ख्या बहिणींशी झाली होती. त्यानंतर काही वर्षांनी मोठ्या जावयाची आपल्या सासूशी जवळीक वाढू लागली. सुरुवातीला संशय म्हणून दुर्लक्ष झाले, पण नंतर ही जवळीक प्रेमसंबंधात बदलली. धक्कादायक म्हणजे,  १२ वर्षांपूर्वीही दोघांनी घर सोडून पलायन केले होते. 'घराची इज्जत' वाचवण्यासाठी त्यावेळी प्रकरण दाबले गेले होते. ना पोलिसांत तक्रार, ना कायदेशीर कारवाई. पण आता महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात जावयाविरुन्द्र लेखी तक्रार दाखल केली आहे.

Advertisement
Tags :

.