For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Birdev Done : नऊवारीतील आई अन् घोंगडं घेतलेले वडील आयपीएस मुलासोबत विमानात

01:00 PM Dec 29, 2025 IST | NEETA POTDAR
birdev done   नऊवारीतील आई अन् घोंगडं घेतलेले वडील आयपीएस मुलासोबत विमानात
Advertisement

                  आयपीएस बिरदेव डोणे यांनी आई-वडिलांना घडवला पहिलाच विमानप्रवास

Advertisement

कोल्हापूर: अतिशय साध्या परिस्थितीतलहानाचा मोठा झालेला तो मुलगा ज्याचं स्वान होतं देशसेवेचं आणि आयपीएस अधिकारी होण्याचं. कठोर मेहनत, अपार संघर्ष आणि न डगमगणाऱ्या जिद्दीच्या जोरावर त्याने ते स्वप्न सत्यात उतरवलं आणि अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलं. त्याच्या यशाचं कौतुक सर्वत्र झालं, पण त्या यशाला खरी उंची मिळाली ती एका हळुवार, भावूक क्षणी नऊवारी साडीतील आई आणि अंगावर घोंगडे घेतलेल्या वडिलांना इंडिगो विमानात बिरदेव डोणे या आयपीएस अधिकाऱ्याने आयुष्यात पहिल्यांदाच विमानप्रवास घडवून आणला.

ग्रामीण भागात वाढलेल्या सर्वसामान्य कुटुंबांसाठी आकाशात उडणारे विमान जबळून पाहणेही मोठे कुतूहल असते. मात्र, त्याच विमानातून सन्मानाने प्रवास करण्याची संधी मिळणे हे स्वप्नवतचम्हणावे लागेल. हेच स्वप्न सत्यात उतरवले आहे मेंढपाळाच्या कुटुंबात जन्मलेल्या आणि आज देशसेवेच्या वाटेवर असलेल्या आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे यांनी आयपीएस पदावर नियुक्त झालेल्या कोल्हापूर जिल्हयातील पमगे येथील बिरदेव डोणे यांचे सध्या हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीत प्रशिक्षण सुरु आहे आपल्या यशामागील खरे आधारस्तंभअसलेल्या आई-वडिलांना प्रशिक्षण केंद्र दाखवण्यासाठी त्यांनी त्यांना हैदराबादला बोलावले.

Advertisement

या निमित्ताने बिरदेव यांनी कुटुंबाला पहिल्यांदाच विमानप्रवास घडवून आणला आई नऊवारी साडीत, तर वडील अंगावर घोंगडे घेऊन इंडिगो विमानात चढताना दिसत होते आलिशान विमानात हा अस्सल ग्रामीण मराठमोळा पेहराव सान्यांचे लक्ष वेधून घेत होता.

Advertisement
Tags :

.