दोन मुलांची हत्या करून आईची आत्महत्या
10:45 AM Sep 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : आईने आपल्या दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केली. तुमकूर जिल्ह्याच्या पावगड तालुक्मयातील कडपलकेरे गावात ही घटना घडली. सरिता (वय 25), युक्ती (वय 4) आणि पुष्पक (दीड वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. मुलांच्या हत्येनंतर सरिताने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. पती संतोष हा ऑटो चालक आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेने गावासह संपूर्ण तालुका हादरला आहे. याची माहिती मिळताच मधुगिरीचे डीवायएसपी मंजुनाथ आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह तुमकूर जिल्हा सरकारी ऊग्णालयात पाठवण्यात आले असून शवविच्छेदनानंतरच निश्चित माहिती उपलब्ध होईल.
Advertisement
Advertisement