गुंजी येथून आईसह दोन मुले बेपत्ता
वार्ताहर/गुंजी
गुंजी येथून आईसह दोन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार खानापूर पोलीस स्थानकात देण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे. गुंजी येथील रहिवासी सायमन बेनीत मस्करेन यांनी सदर तक्रार दिली असून त्यांची पत्नी जेनिफर सायमन मस्करेन (वय 31), मुलगा अँड्रियल (वय 3) व मुलगी किओना (वय 7) हे तिघेजण दि. 10/12/2025 पासून घरातून निघून गेले आहेत. निघताना पत्नीने बेळगाव येथे केएलई हॉस्पिटलमध्ये मुलाला दवाखान्यात दाखवून येते असे सांगून 9.30 वा. बाहेर पडले होते. ते अद्याप घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे दि. 11 डिसेंबर रोजी सायंकाळी खानापूर पोलीस स्थानकात ते बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वरील व्यक्ती कुणाच्या दृष्टीस पडल्यास त्यांनी 9480804086 वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.