महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

झोपडीला लावलेल्या आगीत मायलेकीचा मृत्यू

11:43 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुधोळ तालुक्यातील बेळगली येथील घटना : दोघे जखमी, पोलीस तपास सुरू 

Advertisement

वार्ताहर /जमखंडी

Advertisement

झोपडीवर पेट्रोलची फवारणी करून आग लावण्यात आल्याने झोपेत असलेल्या माता व मुलीचा जळून अंत झाल्याची हृदयद्रावक घटना बागलकोट जिह्यातील मुधोळ तालुक्यातील महालिंगपूर जवळील बेळगली येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. यात दोघेजण जखमी झाले असून त्यांना महालिंगपूर दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, बेळगली येथील अक्किमरडी येथे दस्तगीर साब मौलासाब पेंढारी कुटुंब एका पत्र्याच्या शेडमधील झोपडीत राहत होते.

सोमवारी रात्री कुटुंब झोपेत असताना सिंटेक्स टाकीतून पेट्रोल आणून पंपाने फवारणी करून झोपडी पेटवण्यात आली असता यात जैबानू दस्तगीर पेंढारी (वय 55) व तिची मुलगी शबाना पेंढारी (वय 29) यांचा जळून मृत्यू झाला. तर दस्तगीर पेंढारी (वय 64) व सुभान पेंढारी (वय 27) भाजून जखमी झाले. घटनास्थळी बेळगाव उत्तर वलय पोलीस महानिरीक्षक विकास कुमार, बागलकोट एसपी अमरनाथ रेड्डी, जमखंडी डीवायएसपी शांतवीर ई, मुधोळ सीपीआय महादेव शिरट्टी, पीएसआय अजित कुमार होसमनी यांनी भेट दिली. मुधोळ पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद झाली असून अधिक तपास श्वान पथकाला पाचारण करण्यात येऊन  सुरू करण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article