For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जसपाल यांच्या निधनानंतर मातेचेही निधन

06:16 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
जसपाल यांच्या निधनानंतर मातेचेही निधन
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हृदयविकारामुळे भारतीय नेमबाजीतील दिग्गज जसपाल राणा यांच्या धक्कादायक निधनानंतर काही दिवसांनी, त्यांच्या आई श्यामा देवी यांचेही रुग्णालयात दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर निधन झाले आहे.

जसपाल राणा वयाच्या 49 व्या वर्षी आपत्कालीन हृदय शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी 12 जून रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी श्यामा देवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रविवारी त्यांचे निधन झाले. जसपाल राणा यांचा 50 व्या वाढदिवस दिनीच त्यांचे निधन झाले. ‘प्रसिद्ध भारतीय नेमबाज, पद्मश्री दिवंगत जसपाल राणाजी यांच्या आदरणीय आई आणि श्रीमती नारायण सिंह राणाजी यांच्या पत्नीच्या निधनाची अत्यंत दुखद बातमी आम्हाला मिळाली आहे,’ असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पोस्ट करत दु:ख व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.