अमेरिकेत सर्वाधिक यूट्यूब डायमंड बटणयुक्त चॅनेल
भारताचा क्रमांक दुसरा
युट्यूबवर कंटेंट क्रिएटर्सला त्याच्या चॅनेलच्या यशाला मान्यता देण्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीत प्ले बटन दिले जाते. हे युट्यूबकडून देण्यात येणारे एकप्रकारचे रिवॉर्ड असते. युट्यूबकडून चॅनेल्सला देण्यात येणारा दुसरा सर्वात मोठा रिवॉर्ड डायमंड प्ले बटन आहे. युट्यूब डायमंड बटनयुक्त सर्वाधिक चॅनेल्स अमेरिकेत आहेत. तेथे लोक युट्यूबवर सर्वाधिक कंटेट क्रिएट करतात. डायमंड प्ले बटन त्याच युट्यूबरच्या चॅनेलला दिले जाते, ज्याच्या सब्सक्रायबर्सची संख्या 1 कोटीपर्यंत पोहोचते. म्हणजेच 1 कोटी सब्सक्रायबर झाले तरच डायमंड प्ले बटन मिळू शकते.
अमेरिका सर्वाधिक डायमंड प्ले बटनयुक्त चॅनेल्सप्रकरणी पहिल्या स्थानावर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सनुसार येथे 335 चॅनेल्सला डायमंड प्ले बटन प्राप्त झाले आहे. या सर्व युट्यूब चॅनेल्सकडे एक कोटी किंवा त्याहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. अशा 10 देशांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेनंतर भारताच डायमंड प्ले बटनप्राप्त युट्यूब चॅनेल्स आहेत. भारतात 247 चॅनेल्सना हा रिवॉर्ड युट्यूबकडून प्राप्त झाला आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक लोक भारतातच युट्यूबवर कंटेंट पाहतात आणि तयार करतात. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ब्रिटन, चौथ्या क्रमांकावर कॅनडा, पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, जर्मनी सहाव्या, मग ब्राझील, रशिया, दक्षिण कोरिया आणि केवळ 22 डायमंड प्ले बटनसोबत जपान 10 व्या स्थानावर आहे. पाकिस्तान किंवा अन्य शेजारी देश याप्रकरणी भारतापेक्षा खूपच पिछाडीवर आहेत.