सर्वाधिक पाहिले जाणारे छायाचित्र
छायाचित्राचा छंद बहुतांश लोकांना असतो. सोशल मीडियाच्या युगात लोक फिरण्यापेक्षा अधिक छायाचित्रे आणि व्हिडिओ काढण्यावर अधिक वेळ खर्च करतात. परंतु एक छायाचित्र जगात सर्वाधिक वेळा पाहिले गेले आहे. एक छायाचित्र हजार शब्दांसमान असते. परंतु लोकांना जेव्हा कुठले छायाचित्र अधिकवेळा पाहिले गेले तेव्हा त्यांना अचूक उत्तर देता येत नाही.
सर्वाधिकवेळा पाहिले गेलेले छायाचित्र विंडोच्या एक्सपी वर्जनवर दिसून येणारे छायाचित्र आहे. 2001-07 दरम्यान हे छायाचित्र वॉलपेपर म्हणून डेस्कटॉपच्या विंडोजवर एक्सपीवर सर्वाधिक पाहिले गेले होते. यानंतरही हे छायाचित्र डेस्कटॉपवर कायम आहे. हे छायाचित्र बनावट असल्याचे लोकांना वाटत होते आणि असे ठिकाण जगात कुठेच नसल्याचे त्यांचे मानणे होते. हे छायाचित्र कॉम्प्युटरच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे लोक मानत असले तरीही प्रत्यक्षात हे कॅमेऱ्याद्वारे काढण्यात आलेले छायाचित्र आहे.
निळे आकाश आणि दूरपर्यंत दिसणारे गवताचे मैदान असलेले हे छायाचित्र कॅलिफोर्नियाच्या सोनोमा येथील आहे. हे छायाचित्र फोटोग्राफर चार्ल्स ओरियर यांनी जानेवारी 1996 मध्ये काढले होते. चार्ल्स यांनी हे छायाचित्र दुपारच्यावेळी कॅमेऱ्यात कैद केले हेते, त्यावेळी ते स्वत:च्या प्रेयसीला भेटण्यासाठी जात होते. हे जगातील सर्वाधिक पाहिले जाणारे छायाचित्र ठरेल अशी कल्पनाही त्यांना नव्हती. त्यांच्या छायाचित्राला दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने स्वत:च्या विंडो एक्सपी एडिशनमध्ये वॉलपेपर म्हणून सादर केले होते. यानंतर हे छायाचित्र व्हाइट हाउसपासून रशियन राष्ट्रपतींच्या अधिकृत संगणकात देखील दिसून आले होते.
2014 पासून स्थगिती
2014 पासून मायक्रोसॉफ्टने या छायाचित्राला स्वत:च्या विंडोज डाटावरून हटविले होते. ज्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता, त्यापूर्वी 30 कोटी कॉम्प्युटरमध्ये या छायाचित्राचा वापर होत होता. सद्यकाणत जगभरातील 0.1 टक्के युजर्स अद्याप याचा वापर करत आहेत. या निवडक युजर्समध्ये रशियन राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन देखील सामील आहेत. चार्ल्स यांच्यानुसार त्या छायाचित्राकरता त्यांनी फ्यूजी फिल्म्सचा वापर केला होता.