For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहुतेक धरणांमध्ये शतकी पार पाणीसाठा!

06:11 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
बहुतेक धरणांमध्ये शतकी पार पाणीसाठा
Advertisement

केवळ तिळारी, अंजुणेत 10 टक्क्यांचा फरक

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

परतीचा पाऊस प्रारंभ होऊन यंदाचा मान्सून संपुष्टात येत असताना राज्यातील जवळजवळ सर्व धरणांचे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहेत. हे पाणी पुढील मान्सूनपर्यंत अर्थात जून 2025 मध्ये पावसाळा प्रारंभ होईपर्यंत पुरेल अशाप्रकारे साठविणे व वापरात आणणे आवश्यक बनले आहे.

Advertisement

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात मान्सून अधिकृतपणे संपुष्टात आल्यानंतर,  सरकारकडून मान्सूननंतर नोव्हेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसाचे मोजमाप करण्यात येते. मान्सूननंतरही चांगला पाऊस झाल्यास जमिनीत ओलावा टिकवून राहण्यास मदत होते. त्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्यास थोडा विलंब करता येतो व सदर पाणी ]िपण्यासाठी वापरात आणता येते, हा त्यामागील उद्देश असतो.

पर्यटकांना भुलवतोय साळावलीचा नजारा

सध्या दक्षिण गोव्याच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा करणारे सांगेतील साळावली धरण 103 टक्के एवढे भरले आहे. या धरणाला ‘डक-बिल स्पिलवे’ हे अनोखे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा आपसूक निचरा होत असतो. सध्या त्यातूनच पाण्याचा निचरा सुरू असून मान्सून अधिकृतपणे संपल्यानंतरही काही काळ तो सुरू असतो. धरणाचा हा नजारा आणि तेथील बॉटनिकल गार्डन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

साळावली जलाशय जुलैमध्येच फुल्ल

या हंगामात राज्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे साळावली जलाशयाने जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण क्षमता गाठली होती. त्याशिवाय डिचोली तालुक्यातील आमठाणे जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. या जलाशयातील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात पाठविण्यात येते व प्रक्रिया करून बार्देश व डिचोली तालुक्यातील लोकांना पुरविण्यात येते. कोणत्याही कारणाने तिळारी जलाशयातील पाणी बंद पडल्यास साळ नदीचे पाणी पंप करून आमठणे जलाशयात सोडण्यात येते व बार्देश, डिचोली आणि पेडणे या तालुक्यांना पुरविण्यात येते.

अंजुणे धरणात 91 टक्के पाणी

सत्तरी आणि डिचोली या तालुक्यांमधील काही भागांना पाणीपुरवठा करणारा अंजुणे जलाशय 91 टक्के भरला आहे. या जलाशयाने यंदा पूर्ण क्षमता गाठण्यासाठी सर्वाधिक कालावधी घेतला आहे. दुसऱ्या बाजुने काणकोण तालुक्यातील चापोली जलाशय 100 टक्के भरला आहे. याच तालुक्यातील गावणे धरणाच्या जलाशयातही समाधानकारक पाणीसाठी आहे.

फोंडा तालुक्यातील शिरोडा व परिसराला पाणीपुरवठा करणारे पंचवाडी धरण 101 टक्के भरले आहे.

Advertisement
Tags :

.