थंड हवामानात डास जिवंत राहण्यास सक्षम
कोरडे हवामान आणि जलस्रोत आटल्यावर मच्छरांची संख्या कमी होईल असे मानले जाते. परंतु वास्तव याच्या उलट आहे. मच्छरांकडे अशा कठोर हवामानातही जिवंत राहण्यासाठी कमालीची रणनीति असते. दुष्काळादरम्यान ते स्वत:ला हायड्रेटेड राखण्यासाठी अधिकवेळा चावा घेतात. म्हणजेच दुष्काळी हवामानात मच्छर अधिक धोकादायक ठरतात. याचबरोबर मच्छरांनी बदलत्या हवामानासोबत थंड हवामानातही स्वत:चा नवा अधिवास निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सिनसिनाटी विद्यापीठाशी निगडित वैज्ञानिकांकडुन करण्यात आलेल्या एका अध्ययनात दुष्काळादरम्यान मच्छरांद्वारे होणाऱ्या संक्रमणाच्या घटना नेहमी कमी नसतात असे दिसून आले आहे. जर्नल आयसायन्समध्ये प्रकाशित अध्ययनानुसार मच्छर स्वत:च्या शिकारीला शोधण्यासाठी कार्बन डायऑक्साइचा वापर करतात.
मच्छर कार्बन डायऑक्साइची जाणीव झाली नाही तर त्यांना चावा घेण्यासाठी कुणीच मिळणार नाही. अशा स्थितीत ते दुष्काळाच्या स्थितीत जिवंत राहू शकणार नाहीत. परंतु मच्छरांच्या काही प्रजाती थंड हवामानातही जिवंत राहू शकतात. ते हिवाळ्यापूर्वीच स्वत:चे भोजन एकत्र करतात आणि मोठ्या प्रमाणात चरबी जमा करतात. यानंतर उन्हाळा सुरू होताच अंडी देण्यास सुरू करतात. मच्छरांना सामान्य समजणे चूक ठरेल, प्रत्यक्षात हे अत्यंत कठोर जीव असतात. मच्छर लोकांना तुलनेत अधिक प्रमाणात चावत असतात. हवामान बदलाने स्थिती आणखी खराब होत आहे, कारण थंडीचे प्रमाण कमी होत असल्याने मच्छरांना जिवंत राहण्यास आणि वाढ होण्यास मदत मिळत असल्याचे प्रमुख संशोधक क्रिस्टोफर होम्स यांनी म्हटले आहे.