आईसलँडमध्ये पहिल्यांदाच आढळला मच्छर
अत्यंत थंड हवामान असलेला आइसलँड जगातील एक असा देश आहे, जेथे मच्छर आढळून येत नाहीत, असे आपण पुस्तकांमध्ये वाचत आलो आहोत. परंतु आता जागतिक तापमानवाढीमुळे ही माहिती चुकीची ठरली आहे. आइसलँडमध्ये पहिल्यांदाच मच्छरांचे अस्तित्व आढळून आले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे हा देश किड्यांसाठी पूर्वीपेक्षा अधिक अनुकूल ठरत चालल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. मच्छर आढळून न येणाऱ्या निवडक देशांमध्ये आतापर्यंत आइसलँडचा समावेश होता, तर दुसरे असे स्थान अंटार्क्टिका आहे. आइसलँडमध्ये मच्छरांची पैदास होऊ शकते, कारण येथे दलदलयुक्त जमीन आणि तलावसारखी ठिकाणं प्रजननासाठी आहेत. परंतु अनेक प्रजाती येथील तीव्र हिवाळ्यात जिवंत राहू शकणार नसल्याचे वैज्ञानिकांचे मानणे होते.
वेगाने वाढतेय तापमान
आता आइसलँडचे तापमान उत्तर गोलार्धाच्या सरासरीपेक्षा चारपट वेगाने वाढत आहे. येथील ग्लेशियर वितळत असून दक्षिणेच्या गरम भागांमधील माशांसारखे मॅकेरल देखील आता याच्या नद्या आणि सरोवरांमध्ये आढळून येत आहेत. भूमी उष्ण होण्यासोबत डासांच्या प्रजाती जगातील वेगवेगळ्या हिस्स्यांमध्ये वेगाने फैलावत आहेत. ब्रिटनमध्ये यंदा एडेस अइजिप्तीची (इजिप्तमधील मच्छर) अंडी आढळून आली आहेत. तर एडेस अल्बोपिक्टसचे (आशियाई टायगर मच्छर) नमुने पेंटमध्ये आढळून आले. या धोकादायक प्रजाती असून त्या डेंग्यू, चिकनगुनिया आणि जिका वायरस यासारखे आजार मोठ्या प्रमाणात फैलावू शकतात.
आइसलँडच्या नॅचरल सायन्स इन्स्टीट्यूटमध्ये कीट वैज्ञानिक मॅथियस अल्फ्रेसॉन यांनी देशात मच्छरांच्या शोधाची पुष्टी दिली. कुलिसेटा अॅन्युलाटा प्रजातीचे तीन मच्छर आढळून आले असून यातील दोन मादी आणि एक नर आहे. हे सर्व वाइनच्या दोरखंडावर होते, हे मच्छर थंड हवामानातही तग धरू शकतात आणि हिवाळ्यात तळघर आणि गोदामांमध्ये शरण घेत हवामानाला सामोरे जाऊ शकतात, असे अल्फ्रेसॉन यांनी सांगितले. ब्जॉर्न हज्लटासन यांनी सर्वप्रथम या मच्छरांना पाहिले आणि इन्सेक्ट्स इन आइसलँड नावाच्या फेसबुक ग्रूपमध्ये याची माहिती शेअर केली. वाइनच्या लाल रिबनवर अजब किटक पाहिला, संशय वाटल्याने मी त्याला पकडले होते, यानंतर आणखी दोन मच्छर पकडले आणि सायन्स इन्स्टीट्यूटमध्ये पाठविले जेथे वैज्ञानिकांनी त्यांची पुष्टी केल्याचे ब्जॉर्न यांनी सांगितले.