महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोखरण फायरिंग रेंजमध्ये सरावावेळी मोर्टार स्फोट

06:33 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चार जवान जखमी : जोधपूर इस्पितळात उपचार

Advertisement

वृत्तसंस्था/ जैसलमेर

Advertisement

राजस्थानमधील जैसलमेर येथील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे शुक्रवारी दुपारी 12.35 च्या सुमारास युद्धसराव सुरू असताना अचानक मोर्टार बॉम्बचा स्फोट झाला. या दुर्घटनेत सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान जखमी झाले. स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. सर्व जखमींना पोखरण ऊग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी आणि पोखरण पोलीस ऊग्णालयात पोहोचले. उदय, सुविमल, अभिषेक आणि राहुल कुमार अशी जखमी जवानांची नावे आहेत. उदय आणि अभिषेकची प्रकृती चिंताजनक असून सुविमल आणि राहुलची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. पोखरण येथील ऊग्णालयात सुमारे दीड तास उपचार केल्यानंतर चारही जवानांना खबरदारीचा उपाय म्हणून जोधपूरला रेफर करण्यात आले. सध्या जवानांची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article