Satara News : सातारा शहरात शहापूर माध्यमातून सकाळचा पाणीपुरवठा बंद
04:04 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
शहापूर पाणी उपसा केंद्र बंद
Advertisement
सातारा : सातारा शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी शहापूर माध्यमातील वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने शहापूर येथील पाणी उपसा केंद्र बंद होते. परिणामी शहापूर माध्यमातील पाणी साठवण टाकीस पुरेशी पाण्याची पातळी मिळू शकली नाही.
या कारणामुळे शहापूर माध्यमातून होणारा सकाळ सत्रातील पाणीपुरवठा रद्द करण्यात आला आहे. मात्र पाणी उपलब्धतेनुसार दुपार सत्रातील पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
Advertisement
तरी सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Advertisement