महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताचा वृद्धीदर अंदाज मॉर्गन स्टेनलीने घटविला

07:00 AM May 13, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा अंदाज

Advertisement

मुंबई : चालू आर्थिक वर्षात 2022-23 साठी भारताचा वृद्धीदर अंदाज 0.3 टक्क्यांनी घटवून तो 7.6 टक्के राहणार असल्याचा अंदाज अमेरिकन ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टेनली यांनी व्यक्त केला आहे. सदरचा अंदाज हा बदलत्या जागतिक पातळीवरील परिस्थितीमुळे नोंदवण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

Advertisement

आगामी काळात चलनवाढीची शक्यता लक्षात घेत ब्रोकरेज कंपनीने नव्याने वृद्धीदराचा अंदाज मांडला आहे. चालू आर्थिक वर्षात वृद्धीदर 7.6 टक्के राहणार असून या अगोदर हा अंदाज 7.9 टक्के इतका वर्तवला होता. सध्या महागाईसह इतर गोष्टींमुळे अंदाज बदलावा लागला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी ही वाढ 6.7 टक्के राहणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article