महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कचऱ्यावर प्रक्रिया करणारे नवीन मशीन वापराविना कचऱ्यात; मोरेवाडी ग्रामपंचायतीमधील प्रकार

07:21 PM Jan 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
Morewadi Gram Panchayat waste processing machines
Advertisement

पाचगाव वार्ताहर
मोरेवाडी तालुका करवीर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे नवीन मशीन एकदाही वापर न करता गंजून खराब झाले आहे. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे शासनाने या मशीन साठी खर्च केलेले सुमारे वीस लाख रुपये पाण्यात गेले आहेत. मोरेवाडी ग्रामपंचायतीला सुमारे दहा वर्षांपूर्वी शासनाच्या वतीने सुमारे 20 लाख रुपये किमतीचे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे मशीन देण्यात आले होते. मोरेवाडी ग्रामपंचायतचा कचरा डेपो भारती विद्यापीठ परिसरात आहे. या कचरा डेपोजवळ पत्र्याचे शेड करून हे मशीन बसवण्यात आले आहे.
हे मशीन पत्र्याच्या शेडमध्ये बसवल्यानंतर ट्रायल घेण्यासाठी दोन पोती कचरा वापरण्यात आला. त्यानंतर दहा वर्षात या मशीनचा एकदाही कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापर करण्यात आला नसल्याचे समजते. सध्या हे मशीन पूर्णपणे गंजलेले आहे.

Advertisement

मोरेवाडी परिसराला कचऱ्याची समस्या भेडसावत असताना मोरेवाडी ग्रामपंचायतने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मिळालेले मशीनच कचऱ्यात घालवले आहे. मोरेवाडी ग्रामपंचायतच्या भारती विद्यापीठ जवळील कचरा डेपोला वारंवार आग लावण्यात येते. त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.असे असताना ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचे मशीन खराब केले आहे. ग्रामपंचायतीच्या या भोंगळ नियोजनावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

कचऱ्यावर प्रक्रिया करणारे मशीन गंजून वाया घालवणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून या मशीनचे पैसे वसूल करण्यात यावेत. नागरिकांनी भरलेल्या टॅक्सच्या पैशांमधून ग्रामपंचायतीला हे मशीन मिळाले आहे. शासनाचे पर्यायने नागरिकांचे पैसे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वाया घालवले आहेत. अशा बेजबाबदार पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे अशी मागणी मोरेवाडीचे ग्रामस्थ अण्णासो मोरे यांनी केली आहे.

Advertisement
Tags :
machines in unusedMorewadi GramPanchayattarun bharat newswaste processing
Next Article