For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अधिक काम योग्य, पण दबाव नको !

06:22 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
अधिक काम योग्य  पण दबाव नको
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

कर्मचाऱ्यांनी आठवड्याला किती तास काम करावे, यावर सध्या बरेच वादंग माजले आहे. काही उद्योगपतींनी आठवड्याला 70 तास, काहींनी 80 तास, तर काहींनी 90 तास काम करावे, अशा सूचना केल्या आहेत. तर अनेकांनी या सूचनांना विरोधही केला असून कर्मचाऱ्यांच्या कार्यशक्तीचा अंत पाहू नये, अशीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इन्फोसिस या जगप्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक आणि सल्लागार नारायणमूर्ती यांनी यासंबंधी नवे वक्तव्य केले आहे. मुंबईत ‘किलाचंद स्मृती व्याख्यान कार्यक्रमा’त यांनी नवे विचार व्यक्त केले.

काही महिन्यांपूर्वी त्यांनी प्रत्येकाने आठवड्याला 70 तास काम करावे अशी सूचना केली होती. त्यावर मोठाच वाद निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर इतर अनेक उद्योगपतींनी वेगवेगळ्या सूचना केल्या होत्या. आता नारायणमूर्ती यांनी नवीन वक्तव्य केले असून आठवड्याला जास्तीत जास्त काम कर्मचाऱ्यांनी करणे हे आदर्श मानले जाऊ शकते, तथापि, तसा दबाव त्यांच्यावर टाकला जाऊ शकत नाही. हा त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे, असे स्पष्ट करत हा वाद थांबविण्याचा प्रयत्न केला आहे. जास्त काम करण्याची आवश्यकता आहे. ते देशहिताच्या दृष्टीनेही योग्य आहे. पण, तशी सक्ती करता येणार नाही. ज्यांना अधिक काम करण्यात स्वारस्य आहे, त्यांनी आवश्य तसे करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisement

शोषण करणे चुकीचे

कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करुन घेऊन त्यांचे शोषण करण्याची प्रवृत्ती काही कंपन्यांच्या व्यवस्थापनांकडून दाखविली जाते. हे सर्वथैव अयोग्य आहे. अशा प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य लोकांचा भांडवलशाहीवरचा विश्वास उडतो. भांडवलशाही हे गरीब किंवा मध्यमवर्गियांना लुटण्याचेण् श्रीमंतांच्या हातातील शस्त्र आहे, ही भावना वाढीला लागते. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच तर होतोच, तसेच कंपन्यांच्या कामगिरीवरही होतो, असे विचार नारायणमूर्ती यांनी व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.