For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसयुव्ही गटात अधिक गाड्या येणार : टोयोटा, किया, महिंद्रा, एमजी मोटर्सच्या गाड्यांचा समावेश

06:04 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसयुव्ही गटात अधिक गाड्या येणार   टोयोटा  किया  महिंद्रा  एमजी मोटर्सच्या गाड्यांचा समावेश
Advertisement

येणाऱ्या दिवसात सुधारीत ब्रिझ्झासह अनेक गाड्यांचे लाँचिंग

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आपण येणाऱ्या काही आठवड्यात गाडी खरेदी करण्याचा प्लान बनवत असाल तर योग्य निर्णयाप्रत आपण आला आहात असे म्हणायला जागा आहे. कारण येत्या काही आठवड्यात नव्या कार्सचे लाँचिंग भारतात होणार आहे. अनेक एसयुव्ही व इलेक्ट्रीक कार्सचा यात समावेश असणार आहे. यामध्ये काही जुन्याच ब्रँडच्या गाड्या नव्या सुधारीत स्वरुपात लाँच करण्यात येणार आहेत.

Advertisement

कोणत्या आहेत नव्या गाड्या

सदरच्या येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये कोणत्या गाड्या नव्याने येणार आहेत हे जाणुन घेऊन आपल्याला आपली नवी गाडी घेण्याचा निर्णय अंतिम करणे शक्य होणार आहे. येणाऱ्या काही आठवड्यात पाहता मारुती सुझुकीची सुधारीत ब्रिझ्झा, किया सिरोस इव्ही, टोयोटाची सुधारीत हायलक्स, एमजीची एक्सन आणि महिंद्राची सुधारीत स्कॉर्पियो-एन यांचा समावेश असेल, अशी माहिती मिळते आहे.

मारुती सुझुकीची ब्रिझ्झा- कंपनी आपली नवी सुधारीत ब्रिझ्झा एसयुव्ही गटात 24 जुलैला लाँच करु शकते. या गाडीच्या बुकिंगला आधीच सुरुवात करण्यात आली आहे. नवी ब्रिझ्झा 1.5 लिटर पेट्रोल इंजिन सोबत 1.0 लिटर टर्बो पंट्रोल इंजिनसोबत येऊ शकते. याशिवाय एडीएएस, पॅनॉरमिक सनरुफ, मोठी टचस्क्रीन, व्हेंटीलेटेड सीटस् आणि नवी आधुनिक वैशिष्ट्यो गाडीत असणार आहेत.

किया सिरोस इव्ही- येणाऱ्या काही दिवसात कंपनी आपली नवी इलेक्ट्रीक गटातील सिरोस सादर करु शकते. या गाडीच्या बुकिंगसाठी ग्राहकांना 25 हजार रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत. गाडीच्या बुकिंगला सुरुवात झाली असून यात दोन बॅटरीचे पर्याय असणार आहेत. 51.4 केडब्ल्यूएच बॅटरीची गाडी 526 किमीचे अंतर कापेल तर 42 केडब्ल्यूएच बॅटरीची गाडी 443 किमीचे मायलेज देईल.

टोयोटा हायलक्स सुधारीत- टोयोटा आपली लोकप्रिय पिकअप हायलक्स सुधारीत स्वरुपात सादर करणार आहे. ही गाडी बाजारात 28 जुलै रोजी लाँच केली जाण्याची शक्यता सांगितली जात आहे. या नव्या गाडीत फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलाइटस, नवे बंपर व सिल्वर स्किड प्लेट सारख्या सौंदर्यवर्धक बदल दिसून येणार आहेत. इंजिनमध्ये मात्र कोणताही बदल नसेल असे म्हटले जात आहे. यापूर्वीची गाडी 2.8 लिटर डिझेल इंजिनसह सादर केली होती.

एमजी एक्सन- पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया यांची नवी एक्सन गाडी लाँच होऊ शकते. ही गाडी 2 प्रकारात लाँच होणार असल्याचे बोलले जात आहे. यात एक इलेक्ट्रीक एसयुव्ही व एक प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रीक प्रकारात गाडी सादर होईल. इंडोनेशियात विकली जाणाऱ्या वुलींग एक्सनप्रमाणेच सदरची सादर करण्यात येणारी गाडी असेल, असे म्हटले जात आहे.

महिंद्रा स्कॉर्पियो सुधारीत- भारतातील दिग्गज कार निर्माती कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा आपली नवी स्कॉर्पियो सुधारीत आवृत्ती सादर करु शकते. एसयुव्ही गटात ही गाडी सादर होणार आहे. यात फ्रंट ग्रिल, हेडलाइटस व बंपर दिले जाणार आहेत. या गाडीत काही नवी वैशिष्ट्योही दिली जाणार आहेत, असे कळते. 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिनसह गाडी सादर केली जाईल.

Advertisement
Tags :

.