महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकअदालतीमध्ये बारा हजाराहून अधिक खटले निकाली

06:51 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद : 50 कोटीपेक्षा अधिक रकमेची देवघेव : चौदा तालुक्यांमध्ये लोक अदालत

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 12 हजार 197 खटले निकालात काढण्यात आले आहेत. तब्बल 50 कोटी, 50 लाखाहून अधिक रक्कम देवघेव झाली आहे. पक्षकारांनी या लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही लोक अदालत यशस्वी झाली आहे.

जिल्हा कायदा सेवा प्राधिकारच्या माध्यमातून लोक अदालत भरविण्यात आली. या लोक अदालतीमध्ये 402 चेकबाऊन्स, 210 अपघात नुकसानभरपाई, 554 दिवाणी, 1216 जन्म-मृत्यू दाखला, 62 पोटगीसंदर्भातील खटले निकालात काढण्यात आले आहेत. याचबरोबर जमिनीच्या नुकसानभरपाईचे 16 खटले निकालात काढण्यात आले असून जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली गेली आहे. पती-पत्नीच्या वादातील 15 खटले निकालात काढले गेले.

27 खटले ऑनलाईनच्या माध्यमातून निकालात

या लोक अदालतीमध्ये ऑनलाईनद्वारेही खटले निकालात काढण्यात आले असून एकूण 27 खटले ऑनलाईनच्या माध्यमातून निकालात काढण्यात आले असून 2 कोटी 15 लाख रुपये रक्कम संबंधितांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. न्यायालयात हजर न राहता ऑनलाईनद्वारे हे खटले निकालात काढण्यात आले असून, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अजूनही प्रलंबित असलेल्या खटले धारकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून अर्ज केल्यास त्यांना निश्चितच न्याय मिळू शकतो, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सौंदत्तीत तब्बल बारा वर्षे प्रलंबित खटला निकालात

जिल्हा न्यायाधीश त्यागराज यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगावसह चौदा तालुक्यांमध्ये लोक अदालत पार पडली. सौंदत्ती येथे तब्बल बारा वर्षे प्रलंबित असलेला खटला निकालात काढला गेला आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी ही लोक अदालत भरविण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यातील सर्व न्यायाधीशांनी खटले निकालात काढण्यासाठी परिश्रम घेतले. यामुळेच ही लोक अदालत यशस्वी झाली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article