9 कोटीहून अधिक जणांनी भरला आयटी रिटर्न्स
वृत्तसंस्था/ मुंबई
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 31 मार्च 2025 पर्यंत देशामध्ये 9.19 कोटी लोकांनी आयटी रिटर्न्स भरला असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा सर्वाधिक राहिला आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 करता भरण्यात येणाऱ्या आयटी रिटर्न्ससंदर्भातली माहिती पुढे आली असून 31 मार्चपर्यंत 9 कोटी 19 लाख लोकांनी आयटी रिटर्न्स भरला आहे. यामध्ये 1 कोटी 39 लाख इतक्या महाराष्ट्रातील लोकांनी सर्वाधिक प्रमाणात आयटी रिटर्न्स भरला आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता आयटी रिटर्न्स भरणाऱ्यांची संख्या 7 टक्के वाढीव राहिली आहे. मागच्या आर्थिक वर्षांमध्ये प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या 8.52 कोटी इतकी होती. 2023 च्या आर्थिक वर्षात 7.78 कोटी इतकी होती.
10कोटी पेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांची संख्या वाढतेय. 31 मार्च 2025 पर्यंत 10,814 लोकांनी आयटी रिटर्न्स भरला असून ज्यांचे उत्पन्न 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 5कोटी ते 10 कोटी उत्पन्न असणाऱ्यांची संख्या 16797 इतकी असल्याची माहिती आहे तर 1 ते 5 कोटी उत्पन्न असणाऱ्यांची संख्या 2.97 लाख आहे.