For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सिंधुरत्न जॉब फेअरमध्ये ६ हजारांहून अधिक युवकांनी केलं रजिस्ट्रेशन

11:51 AM Jan 11, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुरत्न जॉब फेअरमध्ये ६ हजारांहून अधिक युवकांनी केलं रजिस्ट्रेशन

विशाल परब ; रजिस्ट्रेशन न केलेल्यांनाही प्राधान्य देणार ; उद्या भव्य मेळावा

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुरत्न जॉब फेअरसाठी सिंधुदुर्ग- रत्नागिरीतून सहा हजारहून अधिक युवकांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यामुळे 12 तारखेला सकाळी सात वाजता जे हजर होणार आहेत तसेच ज्यांनी रजिस्ट्रेशन जरी केलं नसलं तरी त्यांना आम्ही प्रथम प्राधान्य देणार, अशी माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे दिली.दरम्यान युवकांचा मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत असे गौरवोद्गार देखील श्री परब यांनी यावेळी काढले. सावंतवाडी जिमखाना मैदानावर उद्या शुक्रवारी सिंधू रत्न जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली यावेळी बोलत होते.यावेळी विशाल परब पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी सिंधूरत्न जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी युवकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, कोणाचे रजिस्ट्रेशन झालं नसली तरी आम्ही त्यांना समाविष्ट करून घेऊ असे, यावेळी स्पष्ट केले. दरम्यान या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्हास्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील उपस्थित रहावे असे आवाहन देखील श्री परब यावेळी केले. तसेच सर्व युवक युवतींनी या कार्यक्रमांना सकाळी सात वाजल्यापासूनच आपली हजेरी लावावी, असे आवाहन देखील श्री परब यांनी यावेळी केले आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, अँड अनिल निरवडेकर,दिलीप भालेकर, हेमंत बांदेकर, तेजस माने,आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.