For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इफ्फीत 270 हून अधिक चित्रपट

10:34 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
इफ्फीत 270 हून अधिक चित्रपट
Advertisement

आतापर्यंत 6507 प्रतिनिधींची नोंदणी : अनेक ठिकाणी चित्रपटगृहांची सज्जता

Advertisement

पणजी : राज्यभरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची वातावरण निर्मिती झाली असून, इफ्फीच्या तयारीचे काम आता अंतिम टप्प्यात पोहचले आहे. राज्यात 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत 55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) होत असून, या महोत्सवात तब्बल 270 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यासाठी पणजी, पर्वरी, मडगाव व फोंडा या ठिकाणीही सहा चित्रपटगृहे सज्ज करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

काल सोमवारी येथील ईएसजीमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी इफ्फीच्या तयारीची माहिती दिली. गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा तथा आमदार डिलायला लोबो, एनएफडीसीचे संचालक प्रिथुल कुमार, स्मिता वस्त शर्मा, वृंदा देसाई आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय विभागात 81 देशातील 180 हून अधिक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. आतापर्यंत इफ्फीसाठी 6507 प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. यामध्ये 1288 विद्यार्थी, 4023 चित्रपट रसिक तर 1196 चित्रपट सृष्टीत काम करणारे व्यवसायिक आहेत.

Advertisement

‘ओपन एअर स्क्रिनिंग’चा आनंद

गोमंतकीय बांधवांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी वागातोर, मिरामार आणि रवींद्र भवन मडगाव येथे ओपन एअर क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. कांपाल येथे विशेष अरीना उभारला जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मास्टरक्लास घेणार दिग्गज

एनएफडीसीचे संचालक प्रिथुल कुमार यांनी सांगितले की, यंदाच्या इफ्फी महोत्सवात मास्टरक्लास आणि पॅनल चर्चेत राकुल प्रीत, मनोज वाजपेयी, वाणी त्रिपाठी, मनीषा कोईराला, रणबीर कपूर, कीर्ती सानोन, शर्मिला टागोर, ए. आर. रहमान, मणी रत्नम, शबाना आझमी, विनोद चोप्रा, फिलिप नॉईस आणि जॉन सिल यांचा सहभाग राहणार आहे. यंदाच्या इफ्फी महोत्सवाला श्री श्री श्री रविशंकर येणार आहेत. उद्घाटन सोहळ्याला हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील 40 ते 50 कलाकार उपस्थिती लावतील, त्यांची नावे लवकरच जाहीर करणत येतील, असेही प्रिथुल कुमार म्हणाले.

शिमगोत्सव, कार्निव्हाल मिरवणूक

दरम्यान, इफ्फीनिमित्त 22 रोजी दुपारी 3 ते 6 दरम्यान ईएसजी ते कला अकादमी मार्गावर शिगमो आणि कार्निव्हलमध्ये जिंकलेल्या चित्ररथांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

‘सावट’सह 14 गोमंतकीय चित्रपट इफ्फीत

इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा नॉन फीचर विभागात शिवम हरमलकर यांच्या ‘़सावट’ या चित्रपटाची निवड झाली आहे. ईएसजीने सुरू केलेल्या गोवा विभागासाठी 25 प्रवेशिका आल्या होत्या. यातील 14 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

‘इफ्फी’च्या सजावटीत आकाशकंदिलांचा वापर

इफ्फीच्या सजावटीसाठी प्रत्येक तालुक्यातून 50 आकाशकंदील निवडण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी या तत्त्वावर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, प्रत्येक सहभागी आकाशकंदीलास 500 ऊपये देण्यात येणार असून,  5 हजार ऊपये (प्रथम), 3 हजार ऊपये (द्वितीय) तर 2 हजार ऊपये (तृतीय) या क्रमांकाची बक्षिसे 12 तालुक्यांसाठी स्वतंत्र स्वऊपात दिली जाणार आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.