For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2025 सालात 2 कोटीहून अधिक वाहन विक्री

06:14 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
2025 सालात 2 कोटीहून अधिक वाहन विक्री
Advertisement

सुरुवातीच्या महिन्यांमध्ये विक्री सुस्त : जीएसटी सवलतीने विक्रीत सुधारणा

Advertisement

मुंबई :

वाहन क्षेत्रासाठी 2025 हे साल उत्साहवर्धक राहिले आहे. आजतागायत पाहता 2 कोटीपेक्षा अधिक वाहनांची विक्री सदरच्या सालात झाली असल्याचे पहायला मिळाले. 2025 च्या सुरूवातीचा काही महिन्यांचा काळ हा वाहन विक्रीसाठी मंद विकास दर्शविणारा होता. मात्र सरकारच्या जीएसटी कपातीसारख्या धोरणामुळे वाहन विक्रीला वर्षाच्या अखेरच्या सत्रात दमदार प्रतिसाद दिसून आला. 31 डिसेंबरपर्यंत 2.8 कोटी वाहनांची विक्री होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारपर्यंत अर्थात 28 डिसेंबरपर्यंत 2.79 कोटी वाहनांची विक्री झाली होती. दररोज 77 हजारांहून अधिक वाहनांची विक्री होत आहे. कोरोना महामारीच्या आधी 2018 मध्ये 2.54 कोटी वाहनांची विक्री झाली होती. त्यानंतर 2024 मध्ये हा आकडा पार करण्यात आला आहे. जीएसटी करामध्ये सुधारणा, प्राप्तीकर मर्यादेत बदल व व्याजदरामध्ये केलेली घट ही कारणे वाहन खरेदीला प्रोत्साहन देणारी ठरली होती.

Advertisement

काय म्हणाले फाडा उपाध्यक्ष

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर असोसिएशनचे (फाडा)उपाध्यक्ष साई गिरीधर यांच्या मते जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर वाहन विक्रीने कमालीचा वेग पकडला होता. 22 सप्टेंबरपूर्वी वाहन विक्री मंदच राहिली होती. ज्यावेळी वाहन विक्री एक अंकामध्ये वाढ दर्शवित होती. पण जीएसटीमध्ये कपात केल्यानंतर वाहन विक्रीत वाढ दिसून येत आहे. व्याज दरकपात व प्राप्तीकर मर्यादेत केलेली वाढ ही लोकांना वाहन खरेदीसाठी प्रोत्साहित करणारी ठरली.

ऑक्टोबरमध्ये विक्रमी विक्री

मागच्या महिन्यांचा विचार करता ऑक्टोबरमध्ये 40 लाख वाहनांची विक्री झाली आहे. यानंतरच्या नोव्हेंबर महिन्यात 33 लाख वाहनांची विक्री झाली होती. ऑक्टोबरमधील विक्री विक्रमी मानली जात आहे. डिसेंबर महिन्यात 28 तारखेपर्यंत पाहता 17.9 लाख वाहनांची विक्री झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये विक्री नकारात्मक राहिली.

Advertisement
Tags :

.