For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ईएसआय’चे 150 हून अधिक कर्मचारी भीतीच्या छायेखाली

12:32 PM Feb 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ईएसआय’चे 150 हून अधिक कर्मचारी भीतीच्या छायेखाली
Advertisement

सरकारला निवेदन सादर करणार

Advertisement

मडगाव : मडगाव येथील ईएसआय ऊग्णालय, इतर ईएसआय दवाखाने राज्याकडे असताना, ईएसआय अधिकाऱ्यांनी मडगावातील रूग्णालय ताब्यात घेऊन या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची तयारी केल्याने येथील सुमारे 150 हून अधिक कर्मचारी सध्या प्रचंड दडपणाखाली आले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये या रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, एमटीएस, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ईएसआय रूग्णालयातील कर्मचारी आजपर्यंत ईएसआय ऊग्णालय गोवा सरकारच्या कामगार विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. कर्मचाऱ्यांची संपूर्ण भरती प्रक्रिया गोवा सरकारने केली आहे. येथील डॉक्टरांची नियुक्ती गोवा लोकसेवा आयोग (जीपीएससी) द्वारे योग्य निवड प्रक्रियेचे पालन करून करण्यात आली आहे.

सरकारकडून कर्मचारी नियुक्ती

Advertisement

गोवा सरकारने मुलाखतीद्वारे परिचारिका आणि इतर ऊग्णालय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ईएसआय ऊग्णालयात गोवा सरकारने भरलेली सर्व पदे कायमस्वरूपी आहेत. बहुतेक कर्मचाऱ्यांनी संस्थेला समर्पित सेवा दिली आहे, विशेषत: कोविड महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांनी ऊग्णांना नि:स्वार्थपणे सेवा दिली आहे. गोवा सरकारने निवडून नियुक्ती केल्याने स्वाभाविकपणे असे सूचित होते की सेवा गोवा राज्यातच करायच्या होत्या आणि या पदांशी कोणतेही अखिल भारतीय हस्तांतरण दायित्व जोडलेले नव्हते. मात्र भविष्यात येथील कर्मचाऱ्यांची अन्य राज्यात बदली होण्याची भीती कर्मचाऱ्यांच्या मनात आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात रुंपातरणाचा प्रयत्न?

गोवा सरकारमार्फत निवडलेले सर्व कर्मचारी गोवा राज्य सरकारच्या सेवा नियमांनुसार नियंत्रित केले जातात. अलिकडच्या काळात, बातम्या आणि अफवा पसरत आहेत की मडगाव येथील ईएसआय ऊग्णालय, इतर ईएसआय दवाखाने राज्याकडे असताना ईएसआय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतरित करण्याचा प्रस्ताव आहे.

प्रभारी डीनची नियुक्ती संशयाच्या घेऱ्यात

वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतरित करण्याचा प्रस्ताव आहे हे पुढील गोष्टीवरून स्पष्ट होत आहे. तशी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ईएसआय ऊग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्याच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी प्रभारी डीनची नियुक्ती करण्यात आली आहे. हस्तांतरण आणि अधिग्रहणासाठी पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि अनिश्चितता 

कर्मचारी त्यांच्या सेवांच्या भविष्याबद्दल पूर्णपणे अंधारात आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते असे मोठ्या प्रमाणात ऐकले जात आहे की, ईएसआय ऊग्णालयातील सर्व कर्मचारी - नियमित असो वा नसो, सेवेचा कालावधी काहीही असो, यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी ईएसआयसी / मेडिकल कॉलेजमध्ये ‘डीम्ड डेप्युटेशन’ वर पाठवले जाऊ शकते. या डेप्युटेशन कालावधीनंतर काय होईल याबद्दल काहीही स्पष्टता नाही.

सर्वात मोठी भीती अशी आहे की, जर प्रतिनियुक्तीनंतर कर्मचाऱ्यांना गोवा सरकारकडे परत पाठवले गेले तर कामगार विभागाकडे डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट, एमटीएस, तंत्रज्ञ आणि इतर ऊग्णालयातील कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी पर्यायी पदे नाहीत. यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची भावना निर्माण झाली आहे. भविष्यातील सेवा स्थिती, सेवांचे सातत्य, ज्येष्ठता आणि पदोन्नती, निवृत्ती / पेन्शन लाभ मिळणार की नाही याबद्दल ही भीती आहे. अशा अनिश्चिततेचा केवळ कर्मचाऱ्यांवरच नव्हे तर त्यांच्या आश्रित कुटुंबांवरही गंभीर परिणाम होईल, जे त्यांच्या उपजीविकेसाठी पूर्णपणे या नोकऱ्यांवर अवलंबून आहेत.

ईएससीआय विद्यामान गोव्यातील कर्मचाऱ्यांना (कायमस्वरूपी आणि नियमित कर्मचाऱ्यांना 2 वर्षांनी करारबद्ध) काढून राज्याबाहेरून नवीन कर्मचारी आणू शकते, ज्यामुळे कर्मचारी पूर्णपणे भीतीच्या छायेखाली वावरू लागले आहेत. या चिंतांकडे गोवा सरकारने तातडीने लक्ष देणे आणि आश्वासन देणे आवश्यक बनल्याने येथील कर्मचारी लवकरच सरकारला निवेदन सादर करणार आहेत. येथे प्रभारी डीनची नियुक्ती करण्यात आल्यानंतर काही कंत्राटीपद्धतीवर काम करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून गोव्याबाहेरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुरवात झाली आहे.

दीडशे कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात

या सर्व विकासकामांची सुऊवात जवळजवळ 150 हून अधिक कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे. संवादाच्या या अभावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र भीती आणि चिंता निर्माण झाली आहे, ज्यांना आता त्यांच्या ‘उपजीविकेवर’ गंभीर धक्का बसण्याची शक्यता दिसू लागली आहे.

Advertisement
Tags :

.