महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2023 मध्ये 15 लाखपेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री

06:38 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फाडा संघटनेची माहिती : वाहन मागणीत मजबूत राहिले वर्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीच्या बाबतीमध्ये 2023 हे वर्ष मजबूत राहिले आहे. वार्षिक आधारावरती पाहता 2023 मधील इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 49 टक्के अधिक झाली असल्याचेही दिसून आले आहे. या संदर्भातली माहिती वाहन विक्रेता संघटना फाडा यांनी नुकतीच दिली आहे.

2023 मध्ये 15 लाख 29 हजार 947 वाहनांची विक्री झाली असल्याचे दिसून आले. इलेक्ट्रिक वाहन उद्योगाने 2022 मध्ये 10 लाख 25 हजार 63 वाहनांची विक्री केली होती.

किती खपली वाहने

नुकत्याच संपलेल्या 2023 या वर्षांमध्ये 36 टक्के वाढीसह 8 लाख 59 हजार 376 दुचाकींची विक्री झाली आहे. 2022 मध्ये पाहता ही विक्री 6 लाख 31 हजार 464 इतकी होती. तीन चाकी वाहनांच्या विक्रीनेदेखील वर्षाच्या आधारावर दमदार विक्रीत वाढ नोंदवल्याचे दिसून आले आहे. 65 टक्के वाढीसह वर्ष 2023 मध्ये 5 लाख 82 हजार 793 तिचाकींची विक्री करण्यात आली आहे. 2022 मध्ये ही विक्री 3 लाख 52 हजार 710 इतकी होती.

व्यावसायिक वाहनांची विक्री वाढली

दुचाकी चारचाकींकरता इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत असली तरी दुसरीकडे इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या विक्रीनेदेखील नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. 2023 मध्ये 114 टक्के इतक्या दमदार वाढीसह 5,673 व्यावसायिक वाहनांची विक्री झाली आहे. 2022 मध्ये ही संख्या 2649 इतकी होती. इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची संख्या 114 टक्के वाढीसह 82,105 वर पोहोचली आहे. तेव्हा एकंदर पाहता इलेक्ट्रिक वाहनांकरीता 2023 हे वर्ष उत्साहवर्धक ठरलेले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article