महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतात येणार आणखी आफ्रिकन चित्ते

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नव्या ठिकाणी वसविले जाणार : तयारीला वेग

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली 

Advertisement

केंद्र सरकारने चालू वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी 12-14 चित्त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न गतिमान केले आहेत. याकरता चर्चा करण्यासाठी लवकरच भारतीय शिष्टमंडळ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. याचबरोबर चित्ते आणण्यासाठी केनियासोबत चर्चा केली जात असून एका कराराला अंतिम स्वरुप देण्यात येत आहे. चित्त्यांचा पुढील समूह गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात आणण्याची योजना आहे. याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेसोबत चर्चा आहे. एक शिष्टमंडळ थेट चर्चा करण्यासाठी सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या प्रारंभी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. चित्त्यांचा पुढील समूह केनिया किंवा दक्षिण आफ्रिकेतून येऊ शकतो. चित्ता प्रोजेक्ट स्टीरिंग कमिटीची शिफारस आणि योजनेनुसार चालू वर्षाच्या अखेरपर्यंत चित्त्यांचा आणखी एक समूह आणण्याचा प्रयत्न गतिमान करू इच्छितो असे दक्षिण आफ्रिकेला कळविण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

गांधीसागर वन्यजीव अभयारण्याची निवड

चित्त्यांच्या पुढील समुहाला  गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात आणले जाणार आहे, या अभयारण्याची चित्त्यांचा नवा अधिवास म्हणून निवड करण्यात आली आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात यापूर्वीच चित्ते सोडण्यात आले आहेत. तेथे क्षमतेपेक्षा अधिक चित्त्यांची संख्या झाल्याने आता नव्या ठिकाणाची निवड करावी लागली आहे. भारतात चित्त्यांना सोडण्यात आलेल्या कुनो येथे बिबट्यांची अधिक संख्या आणि कमी शिकारीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. केंद्रीय समितीनुसार सप्टेंबर 2022 मध्ये भारतात चित्त्यांना पुन्हा आणल्यावर त्यांच्यासाठी शिकारीची व्यवस्था करणे आणि बिबट्यांपासून वाचविणे प्रमुख आव्हान आहे. कमी शिकारीमुळे मागील वर्षी ऑगस्टमध्ये जंगलातून परत आणल्यावर चित्त्यांना कुनो येथील पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. सध्या अधिकारी कुनो आणि गांधीसागर दोन्ही ठिकाणी शिकारीची व्यवस्था करत आहेत. याचबरोबर बिबट्यांनाही अन्य ठिकाणी पाठविले जात आहे.

गांधीसागर अभयारण्य 368 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेले असून याच्या चहुबाजूला 2,500 चौरस किलोमीटरचे अतिरिक्त क्षेत्र आहे. गांधीसागर अभयारण्यात चित्ते आणण्याच्या कार्ययोजनेनुसार पहिल्या टप्प्यात 64 चौरस किलोमीटरच्या शिकारप्रतिबंधक कुंपणयुक्त क्षेत्रात 5-8 चित्ते सोडले जातील आणि त्यांच्या प्रजननावर लक्ष दिले जाणार आहे. तर कुनो-गांधीसागर या दोन्ही ठिकाणी मिळून 60-70 चित्त्यांची मेटापॉप्युलेशन स्थापित करण्याचे दीर्घकालीन लक्ष्य असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article