महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पुन्हा एकदा मॉरल पोलिसिंग

11:24 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संगमेश्वरनगरात कॉलेज तरुण-तरुणीला बेदम मारहाण : पोलिसांत फिर्याद

Advertisement

बेळगाव : कॉलेज सुटल्यानंतर मोटारसायकलवरून घरी जाणाऱ्या आंतरधर्मीय तरुण-तरुणीला अडवून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी संगमेश्वरनगर परिसरात ही घटना घडली असून एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. संबंधित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल झाला आहे. बीए पहिल्या वर्षात शिकणारा एक तरुण आपल्याच कॉलेजमधील एका अन्य धर्मीय तरुणीला मोटारसायकलवरून घेऊन जात होता. त्यावेळी कारमधून आलेल्या दोघा जणांनी मोटारसायकल अडवून त्यांना जाब विचारला. इतक्यावरच ते दोघे थांबले नाहीत. तर त्यांनी फोन करून आणखी काही जणांना बोलावून घेतले. त्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ‘आमच्या धर्माच्या तरुणीबरोबर का फिरतोस?’ असा जाब विचारला. मारहाण करतानाच त्याला जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस स्थानकापासून जवळच ही घटना घडली आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article