महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सिद्धू मूसेवालाचे वडिल निवडणूकीच्या रिंगणात; काँग्रेसकडून भटिंडाची उमेदवारी मिळणार

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /चंदीगड

Advertisement

पंजाबमध्ये गुंडांच्या टोळीच्या हल्ल्यात मारला गेलेला लोकप्रिय गायक सिद्धू मूसेवालाचे वडिल आता राजकारणात पाऊल  ठेवणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते निवडणूक लढविणार आहेत. यापूर्वी अनेकदा राजकारणात पाऊल ठेवणार नसल्याचे म्हणणारे बलकौर सिंह यांचे मन काँग्रेसने वळविले आहे. काँग्रेसकडून भटिंडा मतदारसंघात त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. बलकौर सिंह यांनी दोन महिन्यांपूर्वीच राजकारणात प्रवेशाचे संकेत दिले होते. आम्ही राजकारण का करू नये असे म्हणत बलकौर सिंह यांनी माजी मुख्यमंत्री बेअंत सिह यांच्या हत्येचे उदाहरण देत त्यांच्या नातवाने खासदार झाल्यावर मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून दिली असल्याचे नमूद केले होते. रवनीत सिंह बिट्टू यांनी न्यायासाठी राजकारणात प्रवेश केला होता आणि यात चुकीचे काहीच नाही, असे बलकौर सिंह यांनी म्हटले. रवनीत सिंह बिट्टू हे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. तसेच लुधियानाचे खासदार राहिले आहेत. रवनीत यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करत निवडणुकीसाठी या पक्षाची उमेदवारी मिळविली आहे. सिद्धू मूसेवालाने 2022 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभा निवडणूक लढविली होती. परंतु त्याला पराभव पत्करावा लागला होता. काँग्रेसने बलकौर सिंह यांना उमेदवारी दिली तर भटिंडा मतदारसंघात मोठी चुरस निर्माण होणार आहे. भटिंडा हा अकाली दलाचा बालेकिल्ला असून येथून हरसिमरत कौर बादल खासदार आहेत. अकाली दल यावेळी देखील त्यांनाच उमेदवारी देणार आहे. भाजपकडून या मतदारसंघात परमपाल कौर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. परमपाल कौल या माजी आयएएस अधिकारी आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article