For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यंदा मान्सून समाधानकारक बरसणार

07:05 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
यंदा मान्सून समाधानकारक बरसणार
Advertisement

 ऐन उकाड्यात हवामान खात्याकडून दिलासादायक अनुमान

Advertisement

दमदार...

  • देशात मान्सूनचा चांगला पाऊस होण्याची चिन्हे
  • हवामान खात्याने जारी केला पावसाचा अंदाज
  • यंदा ला निनोचा प्रभाव मान्सूनसाठी सकारात्मक

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली-एनसीआरसह देशभरातील हवामान सध्या बरेच तप्त झाले आहे. एप्रिल महिन्याच्या सुऊवातीपासूनच देशातील बहुतांश राज्यांमध्ये कडक उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दिल्लीसोबतच देशाच्या बऱ्याच भागात जास्त उष्णता जाणवत आहे. या बदलत्या हवामानाच्या वातावरणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा मान्सूनचा प्रवास दमदार राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी यासंबंधी माहिती देताना सध्याची हवामानाची स्थिती नैर्त्रुत्य मान्सूनसाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट केले. तसेच पावसावर अवलंबून असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा अंदाज महत्त्वाचा मानला जात आहे. यंदा अल निनो लुप्त होत आहे. जूनच्या सुऊवातीस तटस्थ परिस्थिती निर्माण होऊ शकते. नैर्त्रुत्य मान्सूनवर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मध्य प्रशांत महासागराच्या तापमानवाढीचा संदर्भ देताना महापात्र यांनी ही माहिती दिली. जुलै-सप्टेंबरमध्ये ला निनो स्थिती जाणवणार असल्यामुळे मध्य प्रशांत महासागर थंड होण्याची चिन्हे आहेत. भारतीय मान्सूनसाठी ला निनो चांगला आहे. अनेकदा भारतीय मान्सूनवर नकारात्मक परिणाम होत असला तरीही गेल्या वषी त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. तशीच स्थिती यंदाही राहणार असल्याने पर्जन्यमान समाधानकारक राहणार असल्याचे ते म्हणाले.

कृषी क्षेत्राला दिलासा

दक्षिण-पश्चिम मान्सून भारताच्या वार्षिक पावसापैकी सुमारे 70 टक्के पाऊस पुरवतो. हा पाऊस कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे, असे महापात्र म्हणाले. जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा सुमारे 14 टक्के असून 140 कोटी लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकांना रोजगार किंवा व्यवसाय प्राप्त होत असतो. समाधानकारक पावसामुळे कृषी क्षेत्राला उभारी येणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

महिनाअखेरीस सुधारित अहवाल

मान्सून हंगामातील पावसाचा अंदाज देण्यासाठी आयएमडी तीन मोठ्या प्रमाणातील हवामान घटनांचा विचार करते. एल निनो, हिंदी महासागर स्थिती आणि उत्तर हिमालय व युरेशियन भूभागावरील हिमवृष्टी यांचा विचार करून मान्सूनचे परिणाम जाहीर केले जातात. या सर्व घटकांचा विचार करून आयएमडी या महिन्याच्या अखेरीस नैर्त्रुत्य मान्सूनचा अंदाज जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.