कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मान्सूनचे केरळात येत्या 4 ते 5 दिवसात आगमन

06:44 AM May 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुणे/ प्रतिनिधी

Advertisement

नैऋत्य मोसमी वारे वेगाने भारतीय भूभागाकडे प्रवास करीत असून, येत्या 4 ते 5 दिवसात ते देवभूमी केरळात दाखल होतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला. अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टी लगत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, त्याचे बुधवारी कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे.याशिवाय दक्षिण कर्नाटक व आसपासच्या परिसरात हवेची द्रोणीय स्थिती आहे.  बंगालच्या उपसागरात आंध्रप्रदेश, तामिळनाडू लगत हवेची द्रोणीय स्थिती आहे.यामुळे मान्सूनच्या  वाऱ्यांना गती मिळत असून, त्यांनी श्रीलंकेचा बहुतांश भाग, दक्षिण अरबी समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागराचा भाग व्यापला आहे. व्रायांची घोड दौड सुरूच असून, येत्या 4 ते 5 दिवसात ते केरळात पोहोचतील.

Advertisement

केरळात मुसळधार पाऊस

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र तसेच द्रोणीय स्थितीमुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होत आहे. मंगळवारी कर्नाटक तसेच केरळच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली.गेले 5 दिवस केरळात पाऊस सुरूच असल्याने लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत आहेत.

कर्नाटकात रेड अलर्ट, महाराष्ट्रात मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट बुधवारी कर्नाटकात अनेक भागात अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. जोरदार वारे, विजांचा  कडकडाटासह अतिवृष्टी होणार आल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे.

26 मे पर्यंत पाऊस

महाराष्ट्र पासून ते केरळ पर्यंत येत्या सोमवारपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. अनेक भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसात काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकणार अरबी समुद्रात बुधवारी निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकणार असून, त्याची तीव्रता वाढणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस

मंगळवारी दुपारनंतर राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.यात विशेषत? पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची तीव्रता अधिक होती.विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाने अनेक भागाला झोडपून काढले.पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर आदी जिह्यात दमदार पाऊस नोंदविण्यात आला. बुधवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. राज्यात 26 मे पर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article