गोव्यात आजपासून पावसाळा सुरू
मध्यम, हलक्मया स्वरूपात पावसाची शक्यता
पणजी : सोमवार दि. 1 जूनपासून अधिकृतपणे पावसाळी मोसम सुरू होत आहे. आज सायंकाळपर्यंत गोव्यात सर्वत्र मध्यम तथा हलक्मया स्वरूपात पावसाची शक्मयता आहे. येत्या तीन व चार जून रोजी मात्र गोव्यात सर्वत्र जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अधिकृत पावसाळी मोसमला आज प्रारंभ होत आहे, मात्र मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे यंदा मान्सून थोडा उशिरा गोव्यात पोहोचेल, असा अंदाज आहे. हवामान खात्याने मात्र आज व उद्या दोन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
आजपासूनचा पाऊस मान्सूनपूर्व
आजपासून पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस असे मानले जाईल. मान्सून सुरू होण्यास अद्याप चार दिवसांचा विलंब लागेल असा अंदाज आहे. मात्र आजपासून पडणारा पाऊस हा वार्षिक पडणाऱ्या पावसामध्ये नोंदला जाणार आहे. गोव्यात पावसासाठी पूरक असे वातावरण तयार झालेले आहे. रविवारी संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने उकाड्याने जनता हैराण झाली. मात्र पावसाने वाकुल्या दाखविल्या. आज मात्र गोव्यात बऱ्याच भागामध्ये सायंकाळी पावसाचा शिडकावा होईल असा अंदाज आहे. दि. 3 आणि 4 जून रोजी जोरदार पाऊस तसेच जोरदार वारा वाहण्याची शक्मयता आहे, हवामान खात्याने त्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.