For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | पावसाळा तोंडावर, पण सोलापूरचे नाले अजूनही 'फुल्ल'; महापालिकेची नालेसफाई केवळ 'फ्लॉप शो' ठरणार का?

05:01 PM Apr 30, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   पावसाळा तोंडावर  पण सोलापूरचे नाले अजूनही  फुल्ल   महापालिकेची नालेसफाई केवळ  फ्लॉप शो  ठरणार का
Advertisement

                        सोलापुरात नालेसफाईचा पुन्हा ‘फ्लॉप शो’ होणार?

Advertisement

सोलापूर - पावसाळ्याचे वेध लागले, की शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरवात होते. वास्तविक वेळोवेळी स्वच्छ करावेत, अशी या नाल्यांची स्थिती असते. मात्र, पावसाळ्यापूर्वीच सफाईचे काम होते. एखादा मोठा पाऊस झाला, की नात्याची सफाई किती गांभीर्याने केली जाते, याचे उत्तरच मिळते. त्यामुळे अशी सफाई फ्लॉप शो ठरते, हा आजवरचा अनुभव आहे.

या पार्श्वभूमीवर नियोजन आणि गांभीर्यपूर्वक नालेसफाई झाल्यास पावसाळ्यात प्रशासनाला करावी लागणारी धावपळ बांबेल, शिवाय नागरिकांनाही त्रास होणार नाही. नालेसफाईत कागदोपत्री हातसफाई होत असल्याने नालेसफाईचा
खेळखंडोबा होतो. जून महिन्यात पावसाला प्रारंभ होतो. या पार्श्वभूमीवर पावसाळापूर्व नालेसफाईची कामे वेळेवर होणे गरजेचे आहे. मुर्गी नाला, कुंभारवेस नाला, गणेश पेठ शॉपिंग सेंटर नाला, विजापूर रोडवरील नम्रता सोसायटीजवळील नाला हे महत्त्वाचे नाले पावसाळ्यात भरून वाहतात. या नाल्यांच्या परिसरात कायम दुर्गंधी असते. सोलापुरात मान्सूनपूर्व कामे दरवर्षी करण्यात येतात, मात्र ती प्रत्यक्षात न होता कागदावरच होण्याची दाट शक्यता असते, कारण मागील वर्षी पावसाळ्यात कुंभारवेस नाला येथे एक मोटारसायकलस्वार वाढून गेला होता. सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या नात्यांची मान्सूनपूर्व कामे करणे आवश्यक आहे. ऐनवेळी नालेसफाईचे काम करून झाल्याचा आव आणून पुन्हा नागरिकांच्या जिवाशी खेळ होण्याची शक्यता आहे.

Advertisement

त्यामुळेमहापालिकेने मान्सूनपूर्व कामे आताच करणे आवश्यक आहे. या नाल्यांत गाळ साचल्याने दुर्गंधी सुटते, ज्यामुळे नाला परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. नाल्यांतील गाळ काढणे, कचरा टाकणाऱ्यांवर निर्बंध आणून कारवाई करणे आणि नाल्यात रस्त्यावरील माती जाणार नाही, यानुसार नाला दुरुस्ती करणे आवश्यक आहे. नाल्याच्या बाजूला धोकादायक इमारती असून, इमारतींच्या मालकांना आगाऊ
सूचना देणे महत्वाचे आहे. मनपाने एप्रिल २०२६ मध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात नालेसफाई व ड्रेनेज लाईनच्या कामांना सुरुवात केली आहे, ज्या अंतर्गत आयुक्तांनी मुख्य नाल्यांची पाहणी करून तांत्रिक सूचना दिल्या आहेत. मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी इंदिरा नगर ते एस.टी. बस स्थानक क्र. २, तसेच जुळे सोलापूर म्हाडा कॉलनी येथील नाल्यांची पाहणी केली व स्वच्छतेबाबत कडक सूचना दिल्या आहेत.

Advertisement
Tags :

.