For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Monsoon Update देशभरात पुढच्या २४ तासांत पावसाची अशी असेल स्थिती, हवामान विभागाचा अंदाज

11:08 PM Jul 09, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
monsoon update देशभरात पुढच्या २४ तासांत पावसाची अशी असेल स्थिती  हवामान विभागाचा अंदाज
Advertisement

गेल्या काही तासांत पावसाने उसंत दिली असली तरी मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असून दिल्लीपासून ते केरळपर्यंत आणि महाराष्ट्र, राजस्थानपासून पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशपर्यंत देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच महाराष्ट्रात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक दुर्घटनाही या काळात घडल्या ज्यावरुन महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनातही त्याचे पडसाद पडलेले पाहायला मिळाले.

Advertisement

भारतीय हवामान विभागाकडून शुक्रवारी १३ राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी राज्यात पाऊस कोसळणार का? काय स्थिती आहे? हवामान विभागाने नेमकं काय सांगितले? राज्यातील उद्या पावसाची स्थिती काय असेल? जाणून घेऊयात...

महाराष्ट्रात पुढच्या २४ तासात काय होईल?

राज्यात पावसाने आठवडाभर धुमाकूळ घातल्यानंतर आता विश्रांती घेतली आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता कमीच आहे. शुक्रवारी राज्यात कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट अथवा रेड अलर्ट देण्यात आला नाही.

Advertisement

शुक्रवारपासून विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात शुक्रवारी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर आणि पुण्यासह इतर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला आहे.

देशातील पावसाच्या एकूण अंदाजात उत्तर भारतात पावसाने थोडा दिलासा देण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारी दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागांमध्ये हलका पाऊस आणि तुरळक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर भारतात काय होईल?

IMD च्या अंदाजानुसार उत्तराखंडमध्ये पाऊस सुरूच असून शुक्रवारी उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याशिवाय हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशातील बृजवासी जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात १३ जुलैपर्यंत सर्वत्र पाऊस पडेल, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.