मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर
गोव्यापर्यंत धडक : कर्नाटक, तामिळनाडू राज्याचा अधिकांश भाग व्यापला
त. भा. प्रतिनिधी
पुणे
केरळममध्ये दाखल झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांनी अवघ्या एका दिवसांतच गोवा राज्यात प्रवेश केला आहे. कर्नाटक, तामिळनाडूचा बहुतांश भाग व्यापत आता मान्सून शुक्रवारी महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला असून, दोन दिवसांत तो तळकोकणात प्रवेश करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नैत्म मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी केरळममध्ये प्रवेश केला. पोषक हवामानामुळे कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण कर्नाटकचा बहुतांश भाग मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी व्यापला आहे. उत्तर गोव्याचा केंचित भाग वगळता गोव्याचा बहुतांश भाग मान्सूनने काबीज केला आहे. सर्वसाधारणपणे 7 जूनच्या आसपास मान्सून तळकोकणात येतो, येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पणजी, बेंगळूरु, सालेम, पामबन अशी मान्सूनची रेषा आहे.
दरम्यान,कर्नाटक किनारपट्टी व लगतच्या भागावर हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे पुढील दक्षिण कर्नाटक किनारपट्टी आणि केरळममध्ये पुढील दोन दिवसांत अतीवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. गंगेच्या खोऱ्यातील राज्ये, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओरिसा, तामिळनाडूमध्ये पावसाचा अलर्ट आहे. महाराष्ट्रात 9 जूनपर्यंत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा यलो अलर्ट असून, कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याचे मुंबई हवामान विभागाने सांगितले आहे. शुक्रवारी ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 42.9 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
लवकरच मान्सून मुंबई, पुण्यात
याबाबत बोलताना हवामानतज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, पुणे येथे सुमारे 8 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्मयता आहे. मुंबई येथे सुमारे 10 जूनच्या आसपास मान्सून पोहोचू शकतो. महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये (अगदी नागपूरसह) सुमारे 13 जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्मयता आहे. या काळात पावसासोबत मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्मयता आहे.