For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात माकडांचा हैदोस

10:46 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरात माकडांचा हैदोस
Advertisement

घरात शिरून करताहेत साहित्याचे नुकसान : बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

Advertisement

बेळगाव : मागील काही दिवसांपासून शहर परिसरात माकडांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: माकडांकडून घराची कौले आणि इतर साहित्यांचे नुकसान होऊ लागले आहे. वनखात्याने तातडीने बंदोबस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.गोंधळी गल्ली, गणाचारी गल्ली, कंग्राळ गल्ली, गवळी गल्ली आदी परिसरात माकडांचा घरांवर उपद्रव वाढला आहे. यामुळे कौले, खिडकीच्या काचा आणि इतर साहित्याचे नुकसान होत आहे.माकडांचा कळप येत असल्यामुळे महिलांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे.संपूर्ण कळपच घरांवरून उड्या घालत असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घरात शिरून माकडे साहित्य पळवत आहेत.

माकडांचा अधिक वावर वाढल्यास वन विभागाकडे संपर्क साधा

माकडांचा अधिक वावर वाढल्यास वन विभागाकडे संपर्क साधावा. माकडांना प्रेमापोटी खाद्यपदार्थ देणे टाळावे. शिवाय नागरिकांनी माकडासोबत संघर्ष आणि मैत्रीदेखील करू नये, ती स्वत:हून निघून जातील.

-पुरुषोत्तम रावजी (आरएफओ)

Advertisement
Advertisement
Tags :

.