For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बँक खात्यांच्या व्यवहारांवर नजर ठेवा

11:20 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
बँक खात्यांच्या व्यवहारांवर नजर ठेवा
Advertisement

विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांची अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेळगाव : निवडणुकीतील बेकायदेशीरबाबतच्या सिव्हीझिलद्वारे आलेल्या अथवा नागरिकांकडून दिलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता तत्काळ तक्रारींची छाननी करून दखल घेण्यात यावी. संशयास्पद बँक खात्यांच्या व्यवहारांवर नजर ठेवा, अशी सूचना विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्हा पंचायत सभागृहामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची व खर्च निरीक्षक, तसेच विविध नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ते बोलत होते. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने बेकायदेशीर प्रकरणे रोखण्यासाठी तीव्र नजर ठेवण्यात यावी. कोणतीही तक्रार अथवा माहिती आल्यास तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन छाननी करावी. चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या पथकांनी जागरुक रहावे. एफएसटी पथकाने आपल्या व्याप्तीत निरंतर गस्त घालण्याचे काम सुरू ठेवावे, अशी सूचना त्यांनी केली.

वाणिज्य कर खात्याच्या अधिकाऱ्यांकडून आपल्या दैनंदिन तपासाचे कार्य कायम सुरू ठेवावे. यामध्ये आणखी अधिक सुधारणा करून बेकायदेशीर प्रकरणे उजेडात आणावीत, असे त्यांनी सांगितले. संशयास्पद बँक खात्याच्या व्यवहारांची तपासणी करावी. याबरोबरच कर, अबकारी पोलीस आदी पथकांनीही बेकायदेशीर प्रकरणे तपास करण्यासाठी अधिक जागरुकता दाखवावी, असे विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी सांगितले. यावेळी बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चेकपोस्ट व न्याय संमत निवडणूक घेण्याकरिता आयोगाकडून सूचित करण्यात आलेल्या नियमानुसार कार्यवाही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवण्यात आली असून यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस आयुक्त एडा मार्टिन मार्बनँग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक हरक्रिपाल खटाणा, नर्सिंगराव बी., चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक एन. मोहनकृष्णा, अंकित तिवारी, प्रशिक्षणार्थी अधिकारी शुभम शुक्ला आदी अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.