मनी ट्रान्स्फरचे नियम आजपासून बदलणार
पैसे पाठवण्यासाठी आता फक्त नाव व मोबाईल क्रमांकाचा होणार वापर
नवी दिल्ली :
ऑनलाइन पैशांचा व्यवहार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 फेब्रुवारीपासून ग्राहकांना आता मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी आयएमपीएस उपयुक्त ठरणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत फोन बँकिंग किंवा नेट बँकिंगद्वारे पैसे हस्तांतरित करण्यासाठी लाभार्थी जोडावे लागत होते. मात्र आता फक्त नाव आणि मोबाईल क्रमांकाने हे काम सोपे होणार आहे.
आता तुम्ही एका दिवसात पाच लाख रुपये ऑनलाइन पाठवू शकणार आहात. तेही फक्त नाव आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून. सध्याच्या नियमांनुसार, मोठी रक्कम पाठवण्यासाठी बँक खाते क्रमांक, लाभार्थीचे नाव तसेच आयएफएससी कोड आवश्यक होता. पण आता फक्त मोबाईल नंबर आणि नाव असले तरी पैसे पाठवणे सोपे होणार आहे.
एनपीसीआयने 31 ऑक्टोबर रोजी या बदलाची माहिती देणारे परिपत्रक पाठवले होते. त्यानंतर 1 फेब्रुवारीपासून आयएमपीएसच्या नियमांमध्ये बदल होणार असल्याचे सांगण्यात आले. ज्यामध्ये व्यक्ती कोणत्याही लाभार्थीचे नाव न जोडता 5 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवू शकणार आहे.
नवीन नियमांचे फायदे
?या बदलामुळे वेळेची बचत होईल.
?फारशी माहिती नसतानाही कोणाच्याही खात्यावर पैसे पाठवणे सोपे होईल
?एका वेळी 5 लाखांपर्यंत मोठ्या रकमेचे ऑनलाइन हस्तांतरण शक्य