‘द डायरी मणिपूर’मध्ये मोनालिसा
चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान माला आणि मोती विकून प्रसिद्ध झालेली मोनासिला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मोनालिसाचा चित्रपट ‘द डायरी ऑफ मणिपूर’चे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात ती एका गावातील युवतीच्या भूमिकेत आहे. पोस्टरमध्ये ती चित्रपटाच्या नायकासोबत दिसून येते. मोनालिसा कुंभमेळ्यादरम्यान माला विकत असताना कुणीतरी तिचे छायाचित्र टिपले, तिचे हास्य, तिचे डोळे आणि साधेपणाने युक्त सौंदर्य पाहून लोकांचे लक्ष वेधले गेले. तिचे छायाचित्र व्हायरल झाले आणि तिच्या जीवनाने एक नवे वळणहा rघेतले.
स्वत:च्या पहिल्या गीतानंतर मोनालिसाला सनोज मिश्रा यांचा चित्रपट ‘द डायरी ऑफ मणिपूर’साठी करारबद्ध करण्यात आले होते. ती आता इव्हेंट्स आणि ब्रँड प्रमोशनमध्येही भाग घेत आहे. आता मुंबईत स्वत:चे घर खरेदी करण्याचे तिचे स्वप्न आहे.