For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमिरच्या चित्रपटात मोना तिसऱ्यांदा एकत्र करणार काम

06:55 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
आमिरच्या चित्रपटात मोना तिसऱ्यांदा एकत्र करणार काम
Advertisement

जस्सी जैसी कोई नही या मालिकेद्वारे घरोघरी स्वत:ची ओळख निर्माण करणारी मोना सिंह आता चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे. जून महिन्यात तिचा ‘मुंज्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याला चांगले यश मिळाले होते. चित्रपटातील मोना सिंहच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. मोना सिंह आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Advertisement

मोना सिंहने ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात करिना कपूरच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. स्वत:च्या दमदार अभिनयासाठी तिची प्रशंसा झाली होती. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. यानंतर मोना सिंहने ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात आमिरसोबत काम केले होते. आता हे दोघे एकत्र काम करण्याची हॅट्ट्रिक करणार आहेत.

आमिर खानकडून ‘हॅप्पी पटेल खतरनाक जासूस’ हा चित्रपट निर्माण केला जाणार आहे. मोना सिंह यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटात तिने एका गँगस्टरची भूमिका साकारल्याचे समजते. वीरदास आणि कवि शास्त्राr यांच्याकडून या चित्रपटाचे दिग्दर्श केले जाणार आहे. या चित्रपटात मोना सिंह सोबत मिथिला पालकर आणि शारिब हाशमी हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.