For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मायक्रो-मिसाईल ‘ज्वाला’ मोहिमेला गती

06:49 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मायक्रो मिसाईल ‘ज्वाला’ मोहिमेला गती
Advertisement

‘आयजी डिफेन्स’कडून दोन सॉलिड रॉकेट मोटर्सची यशस्वी चाचणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय खाजगी संरक्षण कंपनी ‘आयजी डिफेन्स’ने आपल्या ‘ज्वाला’ नामक सूक्ष्म-क्षेपणास्त्र (मायक्रो-मिसाईल) मोहिमेचा भाग म्हणून दोन सॉलिड रॉकेट मोटर्सची यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी शनिवार, 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास झाली. हे यश कंपनीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ‘ज्वाला’ हा भारताचा पहिला स्वदेशी खाजगी सूक्ष्म-क्षेपणास्त्र कार्यक्रम असून तो हार्ड-किल काउंटर-यूएएस प्रणाली विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो.

Advertisement

आधुनिक युद्धात ड्रोनच्या वाढत्या वापरामुळे हवाई संरक्षणासमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. स्वस्तात आणि मोठ्या संख्येने ड्रोन तैनात करण्याच्या क्षमतेमुळे किफायतशीर प्रतिउपाययोजनांची गरज वाढली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ‘ज्वाला’ मोहीम विकसित केली जात आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सध्याच्या हवाई संरक्षण प्रणालीसोबत एकत्रित होऊन मोठ्या प्रमाणावरील ड्रोन धोक्यांना तोंड देऊ शकेल. आजच्या संघर्षांमध्ये ड्रोनचे हल्ले सामान्य झाले आहेत. ते स्वस्त आणि प्रभावी दोन्ही सिद्ध होत आहेत. प्रत्येक ड्रोनला महागड्या क्षेपणास्त्रांनी पाडणे आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असल्यामुळे, स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची मागणी वाढली आहे.

‘आयजी डिफेन्स’ने दोन सॉलिड रॉकेट मोटर्सची केलेली यशस्वी चाचणी आत्मनिर्भर भारताच्या ध्येयपूर्तीसाठी खाजगी क्षेत्राचा महत्त्वपूर्ण सहभाग दर्शवतो. आयजी डिफेन्स स्वदेशी प्रणोदन, इंटरसेप्टर आणि काउंटर-यूएएस तंत्रज्ञानावर काम करत आहे. यशस्वी चाचणीनंतर कंपनी प्रणालीची परिपक्वता, विश्वसनीयता, उत्पादनक्षमता आणि विस्तारक्षमतेवर लक्ष केंद्रित करणार आहे. आधुनिक युद्धातील ड्रोन धोक्यांविरुद्ध परवडणाऱ्या आणि प्रभावी प्रणाली विकसित करणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक आहे. ‘ज्वाला’ आणि ‘ग्रिड’ यांचे संयोजन महागड्या संरक्षण प्रणालींवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल. या यशामुळे भारतीय खाजगी कंपन्या आता गुंतागुंतीच्या संरक्षण तंत्रज्ञानामध्येही प्रगती करत आहेत आणि देशाच्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम होत आहेत.

........................

Advertisement
Tags :

.