मॉलिन्यूक्स मालिका बाहेर
06:22 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ होबार्ट
Advertisement
सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर मालिका खेळत आहे. ऑस्ट्रेलियन संघातील सोफी मॉलिन्युक्स दुखापतीमुळे वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात तसेच त्यानंतर होणाऱ्या एकमेव कसोटीत खेळू शकणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
सोफीला गेल्या काही दिवसांपासून पाठदुखापतीची समस्या चांगलीच जाणवत आहे. आता ऑस्ट्रेलियन संघात मॉलिन्युक्सच्या जागी अष्टपैलु निकोला कॅरेला बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. तसेच इलेसी पेरी आणि किम गॅरेथ या दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू दुखापतीमुळे उर्वरित एकमेव वनडे आणि एकमेव कसोटी सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत.
Advertisement
Advertisement