For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी युवासेना उपतालुकाप्रमुख पदी मोईन खान

04:13 PM Jun 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी युवासेना उपतालुकाप्रमुख पदी मोईन खान
Advertisement

सावंतवाडी :प्रतिनिधी

Advertisement

तालुक्यातील बांदा येथील शिंदे गट युवा सेनेचे धडाडीचे पदाधिकारी मोईन फिरोज खान यांची आज सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मोईन खान यांनी मागील काळात केलेले कार्य पाहता त्यांना सदर निवडीचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब, युवा सेना तालुकाप्रमुख रियाज खान व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मोईन खान, सैफान खान, कैफ शेख हर्षल कल्याणकर, भावेश शेटकर, सतवीर शेखावत, दिव्यम सावंत यांसह युवा सेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आपल्यावर टाकलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे नवनियुक्त युवा सेना तालुकाप्रमुख मोईन खान यांनी सांगितले. सेवानिवृत्त प्राचार्य व बांदा येथील आदर्श व्यक्तिमत्व अन्वर खान यांचे मोईन खान नातू असून अन्वर खान हे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.