माले महापौर निवडणुकीत मोइज्जूंच्या पक्षाचा पराभव
भारत समर्थक पक्षाचा उमेदवार विजयी
वृत्तसंस्था/ माले
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइज्जु यांच्या चीन दौऱ्यानंतर त्यांच्या भारतविरोधी भूमिकेला मोठा झटका बसला आहे. मोइज्जू यांचा पक्ष माले महापौरपदाच्या निवडणुकीत पराभूत झाला आहे. मोइज्जू यांचा पक्ष पीएनसीच्या उमेदवार अजीमा शकूर यांना एमडीपीच्या एडम अजीम यांनी पराभूत पेले आहे.
मोइज्जू हे स्वत: मालेचे महापौर होते. त्यांनी मागील वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. या पदाकरता झालेल्या निवडणुकीत एमडीपी उमेदवार अजीम यांना मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. पीएनसीचा पराभव मोइज्जू यांना एक मोठा झटका आहे. चीन आणि तुर्कियेच्या स्वत:च्या दौऱ्यानंतर मोइज्जू यांना भारतविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
चीनमधून परतल्यावर मोइज्जू यांनी भारताला लक्ष्य केले होते. आमचा देश छोटा असला तरीही अन्य देशांना आमचे शोषण करू देणार नाही. मालदीव कुठल्याही विशेष देशाचा अनुयायी नाही. चीन आमचा मोठा सन्मान करतो. हिंदी महासागर कुठल्याही विशेष देशाची संपत्ती नाही. आम्ही कुणावरही भरवसा न ठेवता स्वत:च्या पायांवर उभे राहणार आहोत. विविध क्षेत्रांमधील मालदीवची भारतावरील निर्भरता आम्ही संपविणार आहोत. उपचारासाठी भारतात जाणे आणि भारतातून औषधे आणणे बंद करणार आहोत असा दावा मोइज्जू यांनी केला आहे.